spot_img
अहमदनगरसुजित झावरे यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग; काय म्हणाले पहा ...

सुजित झावरे यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग; काय म्हणाले पहा …

spot_img

 

देवकृपा फाउंडेशन व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचा निघोज येथे दहीहंडी उत्सव साजरा
पारनेर / नगर सह्याद्री –
तालुक्यातील निघोज येथे सर्वात पहिल्यांदाच देवकृपा फाउंडेशन व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या संकल्पनेतून श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. निघोज येथे हा कार्यक्रम करत सुजित झावरे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणशिंग फुंकले आहे. या कार्यक्रमासाठी पारनेर तालुक्याच्या विविध भागातून सुजित झावरे पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निघोज येथील सुजित झावरे पाटील यांचे सहकारी व संदीप पाटील वराळ फाउंडेशनचे पदाधिकारी उपसरपंच माऊली वरखडे मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

निघोज येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमांमध्ये शिरूर, जुन्नर, पारनेर या भागातील गोविंद पथकांनी सहभाग घेतला होता. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील गोविंद पथकाने सात थरांची सलामी देत दहीहंडी फोडली त्यांच्या या कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले व डोळ्यांचे पारणे फेडणारे थर रचत त्यांनी उपस्थितांचे कौतुक मिळवले. सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान यावेळी करण्यात आला.

यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, पारनेर बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश पठारे, मनसे पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, सुपा गावचे सरपंच योगेश रोकडे, निघोज गावचे सरपंच चित्राताई वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखिले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष भास्करराव उचाळे, निघोज तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश लाळगे, माजी उपसरपंच उमेश सोनवणे, युवा नेते अमोल साळवे, पुणेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, माजी सरपंच सतीश पिंपरकर, सामाजिक कार्यकर्ते किसनराव धुमाळ, युवा नेते संदीप औटी, लोणी मावळा माजी सरपंच अशोक शेळके, पोखरी गावचे सरपंच सतीश पवार, वारणवाडी सरपंच संजय काशीद, वासुंदे गावचे सरपंच भाऊ सैद, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन नारायण झावरे, श्री. ढोकेश्वर पाणी वाटप संस्थेचे चेअरमन बाळासाहेब झावरे, उद्योजक विठ्ठल झावरे, इंजि. निकिल दाते, अशोकराव मेसे, निवृत्ती वरखडे, गंगाधर वरखडे, विठ्ठल कवाद, अशोक खैरे, राहुल आंधळे, योगेश पाटील, रवींद्र आंधळे, देविदास अल्हाट, उद्योजक लहू जाधव, नाभिक संघटनेचे संदीप खंडाळे उद्योजक रवींद्र पडळकर, उद्योजक स्वप्निल राहींज, अमीन पटेल, अमोल रासकर, अभय आहेर, माजी व्हा. चेअरमन अश्विन मंचरे, सबाजी येवले, आदी सुजित झावरे पाटील यांचे सहकारी निघोज येथील ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमातून दिला सामाजिक संदेश…
निघोज येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमा मधून सामाजिक संदेश देण्यात आला यावेळी वासुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाची विद्यार्थिनी कावेरी दाते हिने देशात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना या यावर मत व्यक्त करत उपस्थित जनसमुदायाला भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृतीमध्ये स्त्रिचे या असलेले महत्त्व तसेच महिला संरक्षणावर, महिला सक्षमीकरण या विषयावर भूमिका मांडत सामाजिक संदेश दिला.

संदीप पाटील वराळ यांची संघटना आली कामी..
सुजित पाटील व स्व. संदीप पाटील वराळ यांचे मैत्रीचे संबंध हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहेत आज सुजित पाटील विधानसभेची तयारी पारनेर तालुक्यात करत असून निघोज या ठिकाणी घेण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये संदीप पाटील वराळ यांच्या संघटनेने सचिन पाटील वराळ यांच्या माध्यमातून कार्यक्रम यशस्वी केला. येणाऱ्या विधानसभेच्या मैदानात आता संदीप पाटलांची संघटना सुजित पाटलांना आमदार करण्यासाठी सज्ज झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

पुणे / नगर सह्याद्री - चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने दहा ते पंधरा...

मनपाचा ‘तो’ निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी...

.. तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; अविनाश घुले यांचा मनपाला इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ...

कोरठण खंडोबा यात्रोत्सव उत्साहात; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

पारनेर | नगर सह्याद्री:- पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र...