राहुरी / नगर सह्याद्री
Sujay vikhe patil : विखे कुटुंबीयांनी गेली तीन पिढ्यापासून जिल्ह्यासाठी दिलेले योगदान जिल्ह्याची जनता विसरू शकत नाही. विकास आणि विकास हेच ध्येय विखे कुटुंबीयांनी ठेवलेले आहे. त्यामुळे जिल्ह्याची जनता पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान व खासदार म्हणून सुजय विखे यांनाच पसंती देतील असा आत्मविश्वास डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की राहुरी येथे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी शहरातील निवडणूक संदर्भामध्ये नियोजन बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. तर यावेळी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, विरोधी पक्ष नेते दादा पाटील सोनवणे, भाजपाचे शहराध्यक्ष भैय्यासाहेब शेळके, युवा तालुकाध्यक्ष रवींद्र म्हसे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, युवा नेते राजेंद्र उंडे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अण्णासाहेब म्हसे, तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे, शिवाजीराव डौले आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, ही केवळ नियोजन करण्यासंदर्भामध्ये बैठक आहे मात्र यास एवढा मोठा उदंड प्रतिसाद ही सुजय विखे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची नांदी आहे. राहुरीच्या विकासासंदर्भामध्ये कोणी काय केले हे जनता जाणून आहे. ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी काय केले हे देखील जनता जाणून आहे. विकास कामे करण्यामध्ये आम्ही नेहमीच आग्रही राहिलो आहोत. यामध्ये सुजय दादा विखे व नामदार राधाकृष्ण विखे यांनी देखील नेहमीच पुढाकार घेतली आहे. मात्र विकास कामासाठी ज्यांनी साधी नगरपालिकेची एनओसी दिली नाही यांना जनता कधी माफ करणार नाही राहुरीचे ग्रामीण रुग्णालय शासकीय इमारत अशा अनेक योजना नामदार व खासदार यांच्या माध्यमातून राहुरी मध्ये सुरू झाले आहेत मात्र याचे श्रेय लाटण्याचे काम करणाऱ्यांना आता जनता घरी बसवेल ज्यांनी राहुरीची कामधेनु राहुरी कारखाना बंद पाडला व हे पाप केले तेच आता आरोप दुसऱ्यांवर लावत आहेत. मात्र जनता दूध खुळी नाही त्यांना मतांच्या माध्यमातून जनता धडा शिकवेल.
यावेळी खासदार सुजय विखे यांनी सांगितले की राहुरी ची जनता आमच्यावर प्रेम करणारी आहे. गेली तीन पिढ्या राहुरीने आमच्यावर प्रेम केले आहे. आणि आम्ही देखील राहुरीला शक्य तेवढे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे राहुरी ही आमच्यावर नेहमीच प्रेम करते मागच्या निवडणुकीत जेवढे मताधिक्य राहुरीतून मिळाले त्यापेक्षाही जास्त या निवडणुकीत मिळेल यात मला कोणतीह शंका वाटत नाही जी कामे शक्य नव्हती ती कामे आम्ही राहुरी इथून करून दाखवली आहे.
राहुरीच्या उज्वल भविष्याला धोकेदायक असणाऱ्यांना हद्दपार करण्याची आता गरज आहे. आमचे राजकारण कधीही दहशतीचे नव्हते मात्र समोरचा उमेदवार कोणत्या पद्धतीचा आहे. हे ओळखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण संघटित होऊन या प्रवृत्तीला हद्दपार करण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी हेच पंतप्रधान होणार व मी पुन्हा खासदार होणार यात कोणी शंका बाळगू नका आपल्या घरापासून प्रचार सुरू करा विजय तर नक्कीच होणार मात्र मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न आपण करा असे आवाहन सुजय विखे यांनी केले.