spot_img
अहमदनगरसुजयच्या चार सभा झाल्या म्हणून एवढं झोंबलं'; मंत्री विखे पाटील कडाडले

सुजयच्या चार सभा झाल्या म्हणून एवढं झोंबलं’; मंत्री विखे पाटील कडाडले

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
आपली लढाई दहशतवादा विरोधात आहे. संगमनेर विधानसभेत उमेदवार कोण हे पाहू नका. वसंतराव देशमुख यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. त्याचा निषेध मी केलाय. मात्र पंधरा मिनिटात मारणारे कसे जमा होतात? हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुजय विखेच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं, अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. आता जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी महायुतीच्या वतीने अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित संगमनेरमध्ये जाहीर निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा सन्मान करणारं महायुतीचं सरकार आहे.केवळ घोषणा देऊन मतं मिळत नाही. सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम सरकारने केलंय. सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय आहे. त्याची प्रचिती आता यायला लागलीय. तिसऱ्यांदा मोदींना लोकांनी पंतप्रधान केलं.

बदलापूर आणि संगमनेरसह इतर ठिकाणी घडलेल्या घटनेला आघाडी जबाबदार आहे. दांडकाई करणाऱ्यांना, वाळूवाल्यांना तुम्ही घाबरला का? मग का तुम्ही निषेधाचे बोर्ड लावले नाही. राजकीय दहशतवाद इथे निर्माण केला जातोय. स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांची इथे पिलावळ आहे, असे म्हणत विखे पाटील यांनी काँग्रेस बाळासाहेब थोरातांवर टीका केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....