अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि देवस्थान मंडळाकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मागिल काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान विविध मुद्यांमुळे चर्चेत आहेत.
महिनाभरापूर्वी 114 मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले होते. त्यानंतर देवस्थानाचे बनावट अॅप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप देखील झाला होता. या प्रकरणात सध्या चौकशी सुरु होती. अनेक दिवसापासून शनिशिंगणापूर देवस्थान बनावट ॲप हा मुद्दा चर्चेत असताना अशा प्रकारच्या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क यांना उधाण आले आहे