spot_img
ब्रेकिंगअचानक आली अन् झुंबड उडाली; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

अचानक आली अन् झुंबड उडाली; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

spot_img

Gautami Patil: गौतमी पाटील, महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा, हिच्या कार्यक्रमावर गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात कोल्हापुरात बंदी घालण्यात आली होती. मात्र, आज ती अचानक करवीर तालुक्यातील राशिवडे गावातील ‘सावकार’ गणपतीच्या महाआरतीसाठी उपस्थित राहिली, ज्यामुळे गावात झुंबड उडाली.

गेल्या वर्षी, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नंदगाव आणि राशिवडे येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून त्या कार्यक्रमास परवानगी नाकारली होती. यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घातली असतानाही, आज तिने सावकार गणपतीच्या महाआरतीसाठी येणार असल्याचे शनिवारी सायंकाळी स्पष्ट झाले.

सोशल मीडियावर माहिती प्रसारित होताच, राशिवडे गावात बघ्यांची गर्दी सकाळपासूनच वाढू लागली. पोलीस प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त तैनात केला. दुपारी एक वाजता गौतमी पाटील महाआरतीसाठी राशिवडे गावात पोहोचली. तिच्या हस्ते गणपतीची महाआरती करण्यात आली, त्यानंतर तिने जमलेल्या महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत फुगडीही खेळली.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी सावकार गणपती मंडळाने भव्य स्टेज आणि साऊंड सिस्टिम उभारली होती. तथापि, उसळलेल्या गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने सत्कार करण्यासाठी परवानगी नाकारली. सावकार मंडळाने कोणतीही वाच्यता न करता गौतमी पाटीलला महाआरतीसाठी आमंत्रित केले, त्यामुळे पोलीस प्रशासनाला गर्दी नियंत्रणात आणण्यात अडचणी आल्या पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...