spot_img
अहमदनगर'अशी' कामे पैशाशिवाय होत नाहीत, परंतू तुमच्याकडून 'मी' वेगळेच काहीतरी घेणार? अधिकार्‍याच्या...

‘अशी’ कामे पैशाशिवाय होत नाहीत, परंतू तुमच्याकडून ‘मी’ वेगळेच काहीतरी घेणार? अधिकार्‍याच्या कृत्याने पंचायत समितीमध्ये उडाली खळबळ

spot_img

अहमदनगर ।नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील कर्जत पंचायत समितीमध्ये एक खळबळजनक प्रकार घडलाअसून सर्व महिला कर्मचारी संघटनांच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.कर्जत पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी राजा आटकोरे यांनी महिला ग्रामसेवकाचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

अतिरिक्त ग्रामपंचायतीचा कार्यभार देत असतांना तो घेत नसल्याने यासाठी वेगळे काही तरी द्यावे लागते, असे म्हणत विनयभंग करण्याची घटना घडली आहे. या घटनेने महिला कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?
22 तारखेला पंचायत समिती कर्जत येथे मासिक सभा असल्याने सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पीडित महिला कार्यालयामध्ये गेला. त्यावेळी विस्ताराधिकारी आटकोरे कार्यालयात एकटेच होते. यावेळी पीडित महिलेने मला आणखी एका ग्रामपंचायतचा अतिरिक्त कार्यभार देऊ नका, अशी विनंती केली. यावर आटकोरे यांनी अशी कामे पैशाशिवाय होत नाहीत. परंतू तुमच्याकडून मी वेगळेच काहीतरी घेणार आहे, असे म्हणत विनयभंग केला. केला असलयाचे फिर्यादीमध्ये म्हणटले आहे.

कर्जत पंचायत समितीमध्ये खळबळ
ग्रामसेविकेच्या पतीने विस्ताराधिकारी आटकोरे यांची चारित्र्याबद्दल चौकशी केली. त्यात आटकोरे अशाच पद्धतीने इतरही महिला कर्मचार्यांशी वर्तन करत असल्याची माहिती समोर आली. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी याची दखल घेत संबंधित विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेने केले आहे. दरम्यान या घटनेने कर्जत पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली असून सर्व महिला कर्मचारी संघटनांच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

पुणे / नगर सह्याद्री - चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने दहा ते पंधरा...

मनपाचा ‘तो’ निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी...

.. तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; अविनाश घुले यांचा मनपाला इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ...

कोरठण खंडोबा यात्रोत्सव उत्साहात; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

पारनेर | नगर सह्याद्री:- पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र...