spot_img
अहमदनगरAhmednagar: खासदार सुजय विखे यांना यश! धनगर बांधवांचा 'तो' प्रश्न सुटला

Ahmednagar: खासदार सुजय विखे यांना यश! धनगर बांधवांचा ‘तो’ प्रश्न सुटला

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लोकरीपासून उबदार कपडे, स्वेटर आणि गालिचे आदी वस्तू तयार करण्यासाठी करंदी येथे लोकरी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ढवळपुरी, धोत्रे, ढोकी, वनकुटे, पळशी, भनगडेवाडी या परिसरातील धनगर समाजाने याला कडाडून विरोध केला.

ढवळपुरी वनकुटे परिसरात हा प्रकल्प उभा करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी धनगर समाज बांधवांची बैठक घेत तोडगा काढला. लोकर प्रक्रिया केंद्र करंदी ऐवजी ढवळपुरीत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ढवळपुरी येथे हे लोकर प्रक्रिया केंद्रासाठी जागा उपलब्ध करण्यात यावी असे लेखी पत्रच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. ढवळपुरी व परिसरातील मेंढपाळ समाज व मेंढ्याची संख्या लक्षात घेता हे लोकर प्रक्रिया केंद्र आता करंदी ऐवजी ढवळपुरीत साकारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

करंदी येथील गट नंबर १२२२ मधील एकूण क्षेत्र १६.७३ हे. आर पैकी ३ हेटर क्षेत्रावर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लोकर केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासबंधीचा अध्यादेश ९ फेब्रुवारी २०२४ रोजी काढला. परंतु ढवळपुरी, वनकुटे, ढोकी, पळशी, धोत्रे या परिसरात मेंढपाळ समाजाचे प्रमाण या भागात जास्त असल्याने हे लोकर केंद्र उभारण्याची गरज आहे.

त्यामुळे मेंढपाळ बांधव आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आता पुण्यश्लोक पुणे येथील अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंंढी व शेळी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना नगरच्या जिल्हाधिकार्‍यांच्या समन्वयातून लोकर संशोधन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून घेणे तसेच जागा प्राप्त झाल्यानंतर केंद्रासाठी आवश्यक असेलल्या इमारतीचा आराखडा, मशीनरी, मनुष्यबख तसेच फर्निचर इत्यादी बाबींसाठी येणार्‍या खर्चाचा सविस्तर तपशिलासह प्रकल्प अहवाल शासन मान्यतेसाठी सादर करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु करंदी ऐवजी ढवळपुरीत हा प्रकल्प साकारण्यात येणार असल्याने धनगर बांधवांनी जल्लोष केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...