spot_img
अहमदनगरभाजप पक्षश्रेष्ठींना यश! कोल्हे यांची निवडणुकीतून माघार? 'ती' पोस्ट चर्चत; "कुछ पल...

भाजप पक्षश्रेष्ठींना यश! कोल्हे यांची निवडणुकीतून माघार? ‘ती’ पोस्ट चर्चत; “कुछ पल के अंधेरे का अंत…”

spot_img

कोपरगाव । नगर सहयाद्री:-
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारीसाठी आर्ज दाखल करण्यासाठी २९ तारखेपर्यंत मुदत आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी, असा आग्रह कोल्हे समर्थक कार्यकर्त्यांकडून होत आहे. परंतु अर्ज भरण्याला काही दिवसच उरले असताना संभाव्य उमेदवार विवेक कोल्हे यांच्या गटात शांतता आहे. कोल्हे लढणार की थांबणार, याबाबत मतदार संघात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान आता माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी माघार घेत असल्याची भूमिका फेसबुक पोस्टमधलं मांडली आहे.

कोपरगावची महायुतीची जागा अजितदादा गटाचे आशुतोष काळे यांना सुटल्याने भाजपात असलेले कोल्हे गटाची राजकीय कोंडी झाली. मात्र, या जागेचा तिढा सोडवण्यात भाजप पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. बुधवारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी फेसबुकवर एक शायरी पोस्ट करत कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली असून कोल्हे भाजपात राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. वर्षानुवर्षाची पारंपरिक लढत यंदा होणार नसल्याचे चित्र दिसत असून काळे-कोल्हेंच्या ताकतीपुढे महाविकास आघाडीचा उमेदवार कशी टक्कर देणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार तथा विवेक कोल्हे यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, निवडणुकीचे बिगुल वाजले बऱ्याच गोष्टी घडल्या. या दरम्यान गेले अनेक दिवस आपण सर्वजण मला, दादांना आणि खास करून विवेकभैय्यांना विविध माध्यमांतून संपर्क करण्याचा प्रयत्न करता आहात. तुम्हा सर्वांना असणारा विश्वास आणि फक्त आपला कोपरगाव मतदारसंघच नव्हे तर अगदी राज्यभरातून अनेक ठिकाणी आपले हितचिंतक आपल्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.

आम्हाला कल्पना आहे हा काळ सर्वांसाठी अतिशय घालमेल होणारा आहे. तुमच्या भावना आणि कोल्हे कुटुंबाला मिळणारी साथ अविस्मरणीय आहे. स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांपासून जोडलेला आपला ऋणानुबंध हा तीन पिढ्या तितकाच अधिक घट्ट आहे. कार्यकर्ता हा आमच्यासाठी कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे मार्गदर्शन,अनेकांचा संघर्ष आणि युवकांच्या अपेक्षा हे सर्व लक्षात घेऊन केवळ निवडणुकी पुरते नाही तर भविष्यातील दूरदृष्टी जपून पुढे जाण्याचा आपला प्रयत्न आहे.

कितीही संघर्ष वाट्याला आला तरी क्षणभर विचार न करता निर्णय घेऊन पुढे जाणाऱ्यातले आपण आहोत. मात्र, सद्या नीटपणे विचार केला तर दहा वर्षे आपण भारतीय जनता पार्टीत निष्ठेने काम करत आहोत, पक्ष वाढीसाठी तुमचे सर्वांचे कष्ट आहेत. अनेकदा आपण जिथे अधिकार असेल तिथे भांडतो. जरी कधी कधी अन्याय झाला असेलही पण तरी आपण पक्षाला मजबूत ठेवण्यासाठी काम करणारे विश्वासू सहकारी आहोत. हीच आपली विश्वासाची वृत्ती आणि निष्ठा संघर्षाला न्याय देणारी ठरेल.

सत्ता ही सेवेसाठी म्हणून बघणे हा आपला पिंड आहे, जरी गेल्या काही काळ मतदारसंघात केवळ कागदोपत्री विकास असेल तरी प्रत्यक्षात खरा विकासाचा धागा विणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सत्तेतून सेवेची संधी देण्यासाठी आपली दखल पक्ष सर्वच पातळीवर आज घेतो आहे. राज्यात महायुती असल्यामुळे पक्षाची जागा वाटपात अडचण झाली.

यात आपल्याला विजयाची खात्री असतानाही जे काही नेत्यांसोबत झालेल्या चर्चेतून सध्या आपण पुढे जाणार आहोत ते त्याहून अधिक सन्मानाचे असेल कारण आपल्या आजवरच्या विश्वासाची ती पावती असणार आहे. आपली वृत्ती कुणाला धोका देऊन पुढे जाण्याची बिलकुल नाही. त्यामुळे केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी देखील विवेकभैय्यांच्या धाडसी आणि आश्वासक कार्याची दखल घेतली आहे. योग्य ते पावले त्या दृष्टीने पडतील असा विश्वास आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अजितदादांना धक्का!; नागवडेंच्या हाती मशाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा मतदारसंघांमध्ये अनेक राजकीय उलटफेर होत आहेत. काही...

सहा खात्याच्या राज्यमंत्रीपदातून वाडा भरवला; आ. प्राजक्त तनपुरेंच्या विरोधात राहुरीकरांची पश्चातापाची भावना

राहुरी | नगर सह्याद्री:- कोणताही जनसंपर्क नसताना फक्त तनपुरेंच्या घरात जन्म आणि मामाची फिल्डींग यातून...

संदीप कोतकर थांबणार? दोन दिवसात भूमिका जाहीर करणार!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहर विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत माजी महापौर संदीप कोतकर हेच...

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी एका मतदार संघाची जोरदार चर्चा?, उमेदवार कोण?

Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आघाडी घेत पहिली उमेदवारांची यादी जाहीर...