spot_img
ब्रेकिंगखासदार विखे यांच्या पाठपुराव्यास यश! शिरुर-बेल्हा रस्त्यासाठी 'इतके' कोटी

खासदार विखे यांच्या पाठपुराव्यास यश! शिरुर-बेल्हा रस्त्यासाठी ‘इतके’ कोटी

spot_img

निघोज। नगर सहयाद्री-
शिरुर-बेल्हा रस्त्याचे भाग्य उजळणार असून खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पाठपुराव्यामुळे ३८ किलोमीटर रस्त्याच्या कामांसाठी ३८६ कोटी १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी दिली आहे.

अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी निधी सातत्याने उपलब्ध होत होता. मात्र एवढा मोठा निधी उपलब्ध होईल असे कुणालाच स्वप्नात वाटत नव्हते. केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक मंत्रालयाकडून व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग एनएच ७६१ या बेल्हे ते अळकुटी ते देवीभोयरे ते निघोज ते शिरूर या ३८ किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरण, डांबरीकरण व रुंदीकरणासाठी ३८७ कोटी रुपये मंजूर झाले असून यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने खासदार विखे पाटील यांनी पाठपुरावा केला आहे.

शुक्रवार दि. १५ रोजी संबंधित मंत्रालयाने खासदार विखे पाटील संपर्क कार्यालयाला पत्र पाठवून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती दिली आहे. हा रस्ता नगर, शिरुर, पुणे, आळेफाटा मार्गै कल्याण, मुंबई, संगमनेर नाशिक, या प्रवासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून दररोज हजारो वाहने या मार्गावर धावत असतात.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केल्याबद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी अध्यक्ष वसंत चेडे, भाजपा नेते विश्वनाथ कोरडे, सचिन वराळ पाटील, दूध संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार, सरपंच पंकज कारखीले, डॉ अशोक सरोदे, डॉ अजित लंके, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, आदी पदाधिकारी तसेच व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व प्रवासी संघटना पदाधिकारी व जनतेतून अभिनंदन होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...