सुपा । नगर सहयाद्री:-
नगर- पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण गावातील बहुप्रलंबित चौपदरीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, गावातील रस्त्याची आणि गावठाण क्षेत्राची मोजणी नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके, शरद पवळे व ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून हे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रस्ताव तयार केला जाईल आणि त्यानुसार ग्रामस्थांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येणार आहे. यामुळे नारायणगव्हाण गाव लवकरच सुरक्षित आणि अपघातमुक्त होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
नारायणगव्हाणमध्ये सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांवर धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवून मागणी केली होती. अखेर या लढ्याला यश आले असून, चौपदरीकरणासाठीची मोजणी सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
य वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे घोडके रावसाहेब, भडके साहेब, डोंगरे साहेब, भूमिअभिलेख विभागाचे अभय कुलकर्णी, मोजणी अधिकारी धर्मेंद्र जाधव, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गायकवाड, तसेच ग्रामपंचायत उपसरपंच राजेश शेळके, सुनिल भंडारी, विलास खोले, आनंदा खोले, प्रदीप जाधव, तानाची पवळे, लतीफ शेख, किसन शेळके, भास्कर शेळके, संजय शेळके, रमेश कोहकडे, नारायण कोहकडे, लहानू शेळके, सुखदेव शेळके, सतीश पोखरना, संतोष कोहकडे, गोपीनाथ खोले, दत्ता खोले, बाळकृष्ण शेळके, संभाजी दरेकर, नाना खोले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपघातमुक्त नारायणगव्हाणसाठी निर्णायक पाऊल
नारायणगव्हाण गावामध्ये सातत्याने अपघात घडत होते. विशेषतः शाळकरी विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर प्रशासन व लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदन देत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर चौपदरीकरणासाठी मोजणी सुरू झाली आहे. ग्रामस्थांना योग्य मोबदला मिळावा यासाठी पुढेही ठाम पाठपुरावा करणार आहोत.
– सचिन शेळके / शरद पवळे