spot_img
अहमदनगर‌‘जलजीवन‌’च्या प्रलंबित कामांचा अहवाल सादर करा

‌‘जलजीवन‌’च्या प्रलंबित कामांचा अहवाल सादर करा

spot_img

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी | नगर सह्याद्री
जलजीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रलंबित कामांचा अहवाल चालू महिनाअखेर सादर करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष योजनांची पाहणी करावी, तसेच कामामुळे निर्माण झालेल्या रस्त्यांच्या प्रश्नांबाबत उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहाता पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत जलजीवन मिशन व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांच्या आढावाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, तालुक्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जलजीवन मिशनच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंते गणेश भोगावडे, हितेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी विवेक गुंड आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, पाइपलाइन टाकताना रस्त्यांचे नुकसान झाले असून, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. लोणी बुद्रुक व लोणी खुर्द येथील योजना ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ममदापूर येथील टाक्या व वाकडी येथील पाइपलाइनचे काम पर्यायी मार्गाने पूर्ण करावे. रस्ते खोदल्यानंतर माती उघड्यावर पडू नये यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. धनगरवाडी येथील कामे तात्काळ पूर्ण करावीत. कडीत येथील जुन्या योजनांतील साचलेली घाण त्वरित काढावी. उन्हात पडून खराब झालेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी कार्यवाही करावी.

सोनगाव योजनेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करण्यासाठी महसूल व ग्रामविकास यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा. पाइपलाइनसाठी डांबरी रस्त्यांचे खोदकाम टाळावे. जिथे रस्ते खणण्यात आले आहेत, तेथील माहिती संकलित करून अहवाल सादर करावा.योजनेची कामे पूर्ण करताना संबंधित ठेकेदारांनी शासकीय यंत्रणांना विश्वासात न घेतल्याने गावातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यास जबाबदार असणाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी व विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहात, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...