श्री तुळजाभवानी विद्यालयात खडकी येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन
अहमदनगर | नगर सह्याद्री
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोबाईलच्या नादी न लागता मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे. तंदुरुस्तीसाठी खेळ महत्वाचे असून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर खेळात भाग घेतला पाहिजे असे मत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांनी केले.
राष्ट्रीय क्रिडा दिन, नगर तालुका क्रिडा समिती व श्री तुळजाभवानी विद्यालय खडकी यांच्या वतीने तीन दिवसीय तालुकास्तरीय खो खो सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या हस्ते करण्यात आला. पहिला दिवशी १४ वर्षाखालील मुुलांच्या स्पर्धा झाल्या. यात २१ शाळांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक चांगदेव आंधळे यांनी मनोगत व्यक्त करत शाळेविषयी सविस्तर माहिती दिली.
सरपंच प्रविण कोठुळे यांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सरपंच प्राविण कोठुळे, सुनिल कोठुळे, शरद कोठुळे, क्रिडा समिती अध्यक्ष महेंद्र हिंगे, बाळासाहेब बोडखे, भाऊ पवार, दिपक दरेकर, मारूती कोतकर हरीशचद्रे ढगे, सुनिल म्हस्के, बाबा म्हस्के, रंजन ओासरकर, अशोक कळसे, काशीनाथ मते, अक्षय तिपुळे, दादा खेडकर, जयश्री भोस, छाया खेडकर, प्रकाश करंदीकर, रावसाहेब कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, अशोक कोठुळे, आदिनाथ गायकवाड,विनोद निकम, युनुस अत्तार, चंद्रकांत कोठुळे आदींसह खडकीसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खो खो स्पर्धा यशस्वीतेसाठी श्री तुळजाभवानी विद्यालयातील शिक्षक दिपक दरेकर यांच्यासह सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत.