spot_img
अहमदनगरसख्खा भाऊ पक्का वैरी!, मोठ्या भावानं धाकट्या भावाचा गळा घोटला!,'धक्कादायक' वास्तव समोर..

सख्खा भाऊ पक्का वैरी!, मोठ्या भावानं धाकट्या भावाचा गळा घोटला!,’धक्कादायक’ वास्तव समोर..

spot_img

Crime News: सातवड (ता. पाथर्डी) येथील संत्र्याच्या बागेत एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या रहस्यमय खुनाचा छडा लावला असून, धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कौटुंबिक वादातून भावानेच आपल्या लहान भावाचा निर्दयपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

मयत सोमनाथ रामराव पाठक (वय 32) याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेने तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवले गेले. मात्र, शवविच्छेदन अहवाल व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा खून असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपी डॉ.अशोक रामराव पाठक (वय 39, रा. सातवड, ता. पाथर्डी, हल्ली रा. नवनाथनगर, ता. राहाता) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत सोमनाथ याला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत आई व आपल्या मुलाला वारंवार मारहाण करीत होता. वारंवार समज देऊनही त्याच्या वागणुकीत सुधारणा होत नसल्याने मोठा भाऊ अशोक 9 मार्च रोजी त्याला समजवण्यासाठी गावी आला.

मात्र, त्यादिवशीही सोमनाथ दारूच्या नशेत होता आणि त्याने आई व मुलाला धमकावण्यास सुरूवात केली. या वादातून संतप्त झालेल्या अशोकने लाकडी दांडक्याने सोमनाथच्या डोक्यावर, छातीवर व शरीराच्या इतर भागांवर मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी सोमनाथ शेतात पळून गेला, मात्र अशोकने त्याचा पाठलाग करत त्याला पकडले आणि झाडाला बांधले. त्यानंतर हालचाल थांबली असता अशोक घाबरून घटनास्थळावरून पसार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...

भैय्या! सुरुवात करतोय, आशीर्वाद असू द्या; किरण काळे पुन्हा शिवसेना मजबूत करणार

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शिवसेनेचे दिवंगत नेते माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आयरनजर शहरांमध्ये...