अहमदनगर । नगर सह्याद्री
महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. पाचव्या दिवशी साई कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे शहरात सर्वत्र कचर्याचे ढीग पडून होते. राज्य सरकारने येत्या दोन दिवसात सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी न लागल्यास सोमवारपासून मनपा कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी दिला.
पाचव्या दिवशी उपोषण करते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची तब्येत ढासळत चालली असून डॉयटरांच्या वतीने सलाईन घेण्याची विनंती केली आहे. मात्र उपोषणकर्त्यांनी नाकारली आहे. जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या भूकिेवर ते ठाम आहेत.
मनपा कर्मचार्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी स्वत।हून काम बंद आंदोलन केले. मात्र आम्ही त्यांना कामावर जाण्यास सांगितले असून सोमवार पर्यंत हा प्रश्न मार्गी न लागल्यास मनपाचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे. आमदार संग्राम जगताप व भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी राज्य सरकारकडे कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे. येत्या सोमवारपासून महापालिका कर्मचारी पाणीपुरवठा आरोग्य विभाग, दवाखाने, स्वच्छता, स्ट्रीट लाईट बंद ठेवणार असल्याची माहिती युनियनचे सचिव आनंद वायकर यांनी दिली.
अहमदनगर मनपा कर्मचार्याचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न लागू करावा यासाठी पाचव्या दिवशीही उपोषण सुरू असून यावेळी भाजपाचे अध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपच्या महिला अध्यक्ष प्रिया जाधव, सावेडी मंडलाध्यक्ष नितीन शेलार, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, भैय्या गंधे, डॉ. सतीश राजूरकर, आनंद वायकर, मेहेर लहारे, बाळासाहेब गायकवाड, गीता गिल्डा, रामदास आंधळे, गोपाळ वर्मा, दत्ता गाडळकर, मनोज ताठे, अरुण शिंदे, राजेंद्र सातपुते, बाबासाहेब सानप आदी उपस्थित होते.
कर्मचार्यांवर अन्याय होऊ देणार नाही – आगरकर
मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेणार आहे. मनपा कर्मचार्यांवर अन्याय होऊ देणार नाही. कर्मचार्यांना उपोषण करण्याची वेळ येऊ दिली नव्हती पाहिजे. महापालिका कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापूर्वी देखील प्रयत्न केले आहे. तरी कर्मचार्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घ्यावे ही विनंती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केली.