अहमदनगर। नगर सहयाद्री
कारमधून जाणारे कुटुंबीय लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असताना अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्राच्या धाकाने त्यांना लुटले. त्यांच्याजवळील रोख रक्कमेसह तीन लाख ७२ हजारांचे सुमारे १० तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटले.
शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन करून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कुटुंबासोबत नगर पुणे रस्त्यावर केडगाव उपनगरातील हॉटेल कोकणकिंगपासून पुढे ५० याप्रकरणी पार्थ सरथी पटनाईक (वय ४२ रा. हंडेवाडी रस्ता, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी: पटनाईक कुटुंब त्यांच्या कारमधून शनिवारी (दि. २५) दुपारी दोन वाजता पुणे येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. शिर्डी येथून दर्शन करून ते रात्री साडेदहा वाजता पुणे येथे जाण्यासाठी निघाले. रविवारी पहाटे दीड वाजता त्यांनी केडगावातील कोकणकिंग हॉटेलमध्ये जेवण केले.
जेवण करून पुण्याच्या दिशेने निघाले असता हॉटेलपासून ५० मीटरवर त्यांनी रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी कार थांबवली. फिर्यादी, पत्नी व मुलगा कारच्या खाली उतरताच तीन अनोळखी त्यांच्या जवळ आले, त्यातील एकाने फिर्यादीला चाकू दाखवून पत्नीकडील दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे मंगळसूत्र, तीन सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे तीन लाख ७२ हजारांचा १० तोळ्यांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला.
तिघे रात्रीच्या अंधारात नगरच्या दिशेने पसार झाले. फिर्यादी व त्यांचे कुटुंब घाबरले. त्यांनी कारमधून पुणे गाठले. दसऱ्या दिवशी फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.