spot_img
अहमदनगरनागरिकांचे हाल थांबवा! आयुक्त यशवंत डांगे यांना भाजपाचे निवेदन; केली मोठी मागणी..

नागरिकांचे हाल थांबवा! आयुक्त यशवंत डांगे यांना भाजपाचे निवेदन; केली मोठी मागणी..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गेल्या दोन महिन्यांपासून गांधी मैदान, लक्ष्मी कारंजा, आनंदी बाजार, नालेगाव, रंगार गल्ली, गौरी घुमट इत्यादी भागात पाईपलाईनचे व रस्त्याचे काम फारच संथगतीने काम चालू आहे. या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. महानगरपालिकेने या रस्त्याच्या कामाला गती द्यावी. या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले.याप्रसंगी भाजपा प्रदेश सदस्य वसंत लोढा, सरचिटणीस सचिन पारखी, मध्यनगर मंडल अध्यक्ष मयूर बोचूघोळ, संतोष गांधी, बाळासाहेब खताडे, अशोक गुगळे, सुनील तावरे, बबन आढाव, विशाल गायकवाड, उज्वला भांगे, डॉ.दर्शन करमाळकर आदी उपस्थित होते.

सर्व रस्ते उखडले असून पावसामुळे सर्वत्र चिखलमय व दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे.रोज या भागात अपघात होत असून नागरिकांना पायी जाणे, चालणे मुश्किल झाले आहे.बऱ्याच भागात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आलेले आहे.

सर्वत्र खाच खळगे युक्त दलदल मय रस्ते झाले असून या सर्व भागातील दुकाने व व्यवसाय देखील बंद पडलेले आहेत. संबंधित ठेकेदाराचे काम कासवाच्या गतीने चालू आहे.तसेच पिण्याच्या पाण्याचे नागरिकांचे फार हाल होत आहे.तरी ताबडतोब आपण या कामात लक्ष घालून नागरिकांचे हाल थांबवावे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; कोणाच्या खात्यावर पैसे जमा – एसपींनी दिली महत्वाची माहिती

चौकशीतून माहिती उघड | एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शनैश्वर देवस्थानशी...

महाभूकंप! ८.७ तीव्रतेच्या भूकंपाने पॅसिफिक महासागर हादरला, त्सुनामीचा धोका

नगर सह्याद्री वेब टीम : रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची...

शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘दीप चव्हाण’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने दीप...

लाखो नागरिकांचे हाल, केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा; मनोज कोतकर यांची मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हात होत आहेत. त्यामुळे...