माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांचे उपोषण सुरू
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
कुकडीच्या सल्लागार समितीची बैठक होऊन जवळपास आठ दिवस झाले. जलसंपदा विभाग कुकडी कालव्याद्वारे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडणार आहे असे समजते; परंतु रोटेशन किती दिवस आहे, त्याचा कालावधी जाहीर केला नाही. तसेच रोटेशन कोणत्या तारखेला सुरू होणार आहे व कधी संपणार आहे. व तसेच कोणत्या तालुयाला किती दिवस पाणी देणार आहे, हे जाहीर केलेले नाही तसेच रोटेशन कसे करणार आहेत हे देखील जाहीर केले नाही. पाण्याचा कालावधी वाढ करून सर्व फळबागा उभ्या पिकांना आवर्तनात पाणी मिळावे या मागणीसाठी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी उपोषण सुरू केले आहे.
उन्हाळ्याची अत्यंत तीव्रता असताना शेतकर्यांना शेतीसाठी तसेच जनावरांना पिण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. माणसाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याकडे अधिकार्यांबरोबर लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. राजकीय वादामध्ये तालुक्यातील जनता मात्र होरपळून निघत आहे. मागील रोटेशन करत असताना श्रीगोंद्याला पाणी आल्यानंतर आवर्तन काही तासांत उरकून घेतले. त्यामुळे श्रीगोंद्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. यासाठी आताचे रोटेशन सुरू करत असताना अगोदर श्रीगोंद्याला पाणी द्यावे व नंतर कर्जत करमाळा असे करावे. कारण मागच्या पाण्यापासून श्रीगोंदा तालुका वंचित राहिला आहे.
आम्हाला सुरुवातीला पाणी दिल्यास आमच्या तालुक्यातल्या फळबागा व उभी पिके व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. कालवा सुरू झाल्यापासून आमच्यापर्यंत पाणी येईपर्यंत वरून पाऊस येऊ शकतो. कारण करमाळ्याचे आठ ते दहा दिवस, कर्जतचे आठ ते दहा दिवस असा कालावधी धरला तर खाली २० दिवस पाणी जाणार आणि मग श्रीगोंदा सुरू होणार. खालच्या दोन्ही तालुयांना मागच्या वेळेस चांगले पाणी मिळाले आहे. बरोबर त्यांचा कालावधी जास्त असतो. पाणी पोहोचायला पाच दिवस लागतात. एकीण २५ दिवस लागू शकतात.
पाणी लवकर सुटले नाही तर अजूनही उशीर लागो शकतो. तोपर्यंत तालुयात अंत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे गांभीर्यपूर्वक विचार करून तातडीने पाणी सोडावे व पाणी सोडत असताना रोटेशन कसे करणार आहोत ते जाहीर करावे. अन्यथा पुन्हा आम्हाला वेगळे आंदोलन करावे लागेल. ही वेळ आमच्यावर येऊ नये. अधिकारी व पदाधिकार्यांना विनंती आहे की, आपण १३ तारखेपर्यंत पाणी सोडले नाही तर जोपर्यंत पाणी सोडत नाहीत तोपर्यंत श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू राहणार आहे. शेतकरी आणि स्थानिक नेते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ यांनी उपोषणस्थळी भेट दिली व आपले मनोगत व्यक्त केले. मात्र प्रशासनाने फारशी दखल घेतली नाही.