अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्यात शेतकरी, व्यापारी, कुरेशी (खाटीक) समाज जिल्ह्यातील पशुपालक यांच्यावर काही विशिष्ट संघटनामार्फत होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून व गोवंश हत्या बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे करिता शेतकरी, व्यापारी, कुरेशी (खाटीक) समाज, जिल्ह्यातील पशुपालक यांनी जनावरे खरेदी विक्रीचा बाजार बंद आंदोलन सुरु केले आहे. विशिष्ट संघटनांकडून होत असलेली लुटमार थांबवावी व त्यांच्यावर कारवाई व्हावी, व्यापार्यांच्या ठिकावणावर छापेमारी करुन होत असलेली जनावरांची जप्ती थांबवावी, खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जमियतुल कुरेश (खाटीक संघटना) चे अध्यक्ष वाजिद अहमद आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करून कायद्यात सुधारणा आणि गोरक्षकांच्या अत्याचारांवर कारवाईची मागणी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये म्हशी, जर्सी गाय आणि भाकड जनावरांच्या खरेदी-विक्रीवर तथाकथित गोरक्षक आणि काही संघटनांकडून अत्याचार होत असल्याचा आरोप निवेदनात आहे. यामुळे शेतकरी आणि कुरेशी समाजावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. शेती, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा त्यांचा एकमेव उत्पन्नाचा स्रोत असून, कायद्यामुळे जनावरे पोसणे आणि विक्री करणे अशय झाले आहे.निवेदनात म्हटले आहे की, गोरक्षकांकडून मारहाण, लूट आणि खोटे गुन्हे दाखल केले जातात. गोशाळांमध्ये जप्त जनावरांची काळ्या बाजारात विक्री होत असून, शेतकर्यांना त्यांच्या जनावरांची सुटका करताना अवाजवी खर्चाला सामोरे जावे लागते.
यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.आंदोलकांनी मागणी केली आहे की, देशी गाय वगळता इतर जनावरांना कायद्यातून सूट द्यावी, गोरक्षकांवर कठोर कारवाई करावी, आणि कत्तलखान्यांसाठी परवाने द्यावेत. तसेच, जनावर वाहतुकीसाठी आरटीओ परमिट आणि पोलिस संरक्षणाची मागणीही केली आहे.