spot_img
ब्रेकिंगमंत्री अतुल सावे यांच्या कारवर दगडफेक, कुठे घडला प्रकार पहा

मंत्री अतुल सावे यांच्या कारवर दगडफेक, कुठे घडला प्रकार पहा

spot_img

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री
संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संभाजीनगरच्या पुंडलिक नगरातील ऑफिसबाहेर दगडफेक करण्यात आली. मंत्री अतुल सावे यांच्या ऑफिसबाहेर उभ्या असलेल्या कारवर एकाने दगड मारला. दगडफेकीमुळे अतुल सावे यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दगडफेक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री अतुल सावे यांच्या कारवर संभाजीनगरमध्ये दगडफेक करण्यात आली. अतुल सावे पुंडलिकनगर येथील कार्यालयात बसले होते. कार्यालयाबाहेर त्यांची कार उभी होती. या कारवर एकाने दगडफेक केली. दहडफेक करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आरोपी मनोरुग्ण असून त्याच्यावर संभाजीनगरमधील एका ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. गणेश सखाराम शेजुळ असं आरोपी व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती मूळची जालना जिल्ह्यातील असून सध्या संभाजीनगरमधील हनुमाननगरमध्ये राहते. त्याने मंत्र्यांच्या कारच्या काचेवर मोठा दगड मारला. त्यामुळे गाडीची काच फुटली. या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...