spot_img
अहमदनगरनातेवाईकांचे दागिने चोरले, तारण ठेवून कर्ज काढले, 'असा' अडकला जाळ्यात

नातेवाईकांचे दागिने चोरले, तारण ठेवून कर्ज काढले, ‘असा’ अडकला जाळ्यात

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नातेवाईकांच्या घरातून चोरलेले सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यावर कर्ज घेतल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी करणार्‍याला सरडेवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथून ताब्यात घेत अटक केली. प्रशांत मानसिंग बाचकर (वय २७ रा. सरडेवाडी) असे त्याचे नाव आहे. गणपत पोपट कायगुडे (वय ४५ रा. कायगुडे वस्ती, राशिन, ता. कर्जत) हे १२ जून रोजी कुटुंबातील व्यक्तींसह बाहेरगावी गेले असता वृध्द आई – वडील घरात होते.

त्यावेळी त्यांच्या नात्यातील प्रशांत बाचकर वडिलांना औषध देण्यासाठी घरी आला असता त्याने ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची फिर्याद कायगुडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळासाहेब मुळीक, रवींद्र कर्डिले, रोहित मिसाळ, आकाश काळे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाबासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तांत्रिक तपासातून संशयित आरोपी प्रशांत बाचकर राहत्या घरी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला.

दरम्यान, त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतले असल्याचे सांगितले. त्याच्याकडे कर्ज घेतल्याच्या पावत्या मिळून आल्या आहेत. तसेच उर्वरीत एक लाख २० हजारांचे दागिने मिळून आल्याने ते हस्तगत करण्यात आले आहेत. त्याला पुढील तपासकामी कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...