spot_img
ब्रेकिंगपुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडला आहे. पुढचे २४ तास हे अत्यंत महत्त्वाचे सांगण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.आज रायगड आणि पुणे घाटात रेड अलर्ट सांगण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे,पालघर, पुणे घाट, सातारा घाट,रत्नागिरी, छ.सुंभाजीनगर, बीड या जिल्ह्यांना आज ऑरेंज देण्यात आला आहे.

याचसोबत छत्रपती संभाजी नगर, पुणे घाट आणि रायगड या जिल्ह्यांना उद्यादेखील ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढच्या ४८ तासात या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे.यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. याचसोबत पावसाचा रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता. दरम्यान, आता मुंबईसह उपनगरात पावसाने उसंत घेतली आहे.

अलर्ट म्हणजे काय?
रेड अलर्ट म्हणजे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट ही एक चेतावणी असते.
ऑरेंज अलर्ट म्हणजे सतर्कतेचा इशारा असतो. या ठिकाणी खूप जोरात पाऊस पडू शकतो.
येलो अलर्ट म्हणजे संततधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना लक्ष द्यावे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...

पाथर्डीत ढगफुटी; पारनेर, श्रीगोंदा, कर्जतमध्ये अतिवृष्टी, सीना नदीला पूर, कुठे किती पाऊस पहा..

अनेक गावांचा संपर्क तुटला, जनावरे वाहून गेली अहमदनगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहरासह जिल्हा गेल्या तीन...