आमदार दाते यांच्या ‘बापजाद्या’ उल्लेखाने झावरे समर्थक नाराज
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयाच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत भांडण आता उघड झाले आहे. आमदार काशिनाथ दाते यांनी त्यांच्या व्हाट्सअॅप स्टेटसवर सुजित झावरे पाटील यांचा ‘बापजाद्या’ असा अपमानजनक उल्लेख केला. यामुळे झावरे यांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी आता आमदार दाते यांच्याशी कोणताही संबंध ठेवणार नसल्याची घोषणा केली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुजित झावरे यांनी वैयक्तिक वैर विसरून दाते यांना आमदार होण्यासाठी मदत केली. टाकळी ढोकेश्वर आणि ढवळपुरीसारख्या भागात झावरे यांच्या ताकदीमुळे दाते यांना मोठे मताधिय मिळाले. पण निवडणुकीनंतर गेल्या चार महिन्यांपासून झावरे आणि त्यांच्या समर्थकांना पक्षात आणि सत्तेत डावलले जात आहे.
कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलावले जात नाही. त्यातच दाते यांनी शेतकरी पंथशाला यात्रेवरून झावरे यांच्यावर उपहासात्मक काव्य लिहिले आणि बाप जाद्या असा अपमान केला.या प्रकारामुळे झावरे समर्थक प्रचंड नाराज आहेत. ते म्हणतात, आम्ही दाते यांना आमदार केले, पण ते आम्हाला अपमानित करतात. आता त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही! यामुळे पारनेरच्या राजकारणात मोठी फूट पडली आहे. याचा परिणाम येणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर होऊ शकतो. झावरे समर्थक स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहेत. अजित पवार यांना आता हस्तक्षेप करावा लागेल, नाहीतर पक्षाला मोठा फटका बसू शकतो. पारनेरचे राजकारण आता नवे वळण घेणार आहे.
विधानसभा निवडणुकीत आम्ही सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार म्हणून दाते सर यांचे मनलावून काम केले. त्या विजयाला हातभार लावला निवडणुकीनंतर सातत्याने झावरे पाटील गटाला लक्ष करत डावलले जात आहे. याची मनाला सल असून याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.
– बबन पवार (उपसरपंच, ढवळपुरी)
राष्ट्रवादी स्थापनेपासून स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील व सुजित झावरे पाटील यांच्या समवेत तालुयात पक्षासाठी काम केले. आज तालुयात पक्षाचा आमदार झाला तरी आम्हाला कोणत्याही प्रक्रियेमध्ये विचारले जात नाही. विश्वासात घेतले जात नाही हे मोठं खेदजनक आहे.
– अरुणराव ठाणगे, माजी सभापती