spot_img
अहमदनगरकर्डिलेंचे स्टेटमेन्ट; पाचपुतेंच्या डोक्याला 'ताप'

कर्डिलेंचे स्टेटमेन्ट; पाचपुतेंच्या डोक्याला ‘ताप’

spot_img

अहमदनगर ।नगर सहयाद्री:-
भाजप नेते माजी खासदार सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत संगमनेर व राहुरीमधून इच्छा व्यक्त केली आहे. विखे पाटील यांनी व्यक्त केलेल्या इच्छ वरून सर्वाधिक अडचण ही भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची झाली आहे. मात्र कर्डिले हे श्रीगोंदा मतदारसंघातून विधानसभा लढविणार असलेच्या चर्चावरून सूचक विधान केले आहे. पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. याबाबत पक्ष निर्णय घेईल, असेही कर्डिले म्हणाले.

दरम्यान कर्डिलेच्या या विधानामुळे भाजप नेते आ.बबनराव पाचपुते यांची डोकेदुखी वाढली आहे.नगर येेथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विविध पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नावर कर्डिले यांनी जोरदार टोलेबाजी केली. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.

ही लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, मात्र याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे सूचक उत्तर शिवाजीराव कर्डिले यांनी दिले होती. दरम्यान सर्व घडमोडीवर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. राहुरी विधानसभा निवडणूकीत शिवाजीराव कर्डिलेच लढणार असल्याचे नगर सह्याद्रींशी बोलतांना सांगितले. मात्र पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात प्रमुख भूमिका बजवणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कर्डीले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशीही चर्चा आहे.

याबाबत विचारले असता पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. मला पैलवानकीचा छंद आहे, त्यामुळे पैलवानाला बाराही महिने व्यायाम करावा लागतो, तरच तो फडात यशस्वी होतो. तसाच मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो, असेही सूचक वक्तव्य कर्डिले यांनी केले आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून सध्या भाजप नेते बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. याच मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले यांच्या नावांची चर्चा राजकीयवर्तुळात सुरू आहे.

दरम्यान शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या दौर्‍यांबाबतही सुजय विखे यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. या मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडणूक लढवणार आहेत. आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा सर्वपरी तेच आहेत. त्यामुळे मी शिर्डीतून निवडणूक लढवेन, ही चर्चा निष्फळ आहे. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट हेच आहे. पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्ये आमदार राम शिंदे यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. त्याच पध्दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्छा व्यत केली असेल तर, यात गैर काही नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यत केली.

सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्याचा थेट सामना बाळासाहेब थोरात यांच्यात रंगू शकतो. संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात हे सध्या विद्यमान आमदार आहेत. तर सुजय विखे यांनी राहुरी विधानसभा लढवल्यास प्राजक्त तनपुरे विरूद्ध सुजय विखे अशी लढत होईल. सुजय विखे राहुरीतून विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास शिवाजीराव कर्डिले यांनी पर्यायी मतदारसंघ म्हणून श्रीगोंदा मतदारसंघाकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे. मात्र, कार्डिले श्रीगोंद्यात आल्यास आ बबनराव पाचपुते काय करणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कर्डिलेंचा मोर्चा श्रीगोंद्याकडे
सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्याचा थेट सामना बाळासाहेब थोरात यांच्यात रंगू शकतो. संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात हे सध्या विद्यमान आमदार आहेत. तर सुजय विखे यांनी राहुरी विधानसभा लढवल्यास प्राजक्त तनपुरे विरूद्ध सुजय विखे अशी लढत होईल. सुजय विखे राहुरीतून विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास कर्डिले यांनी पर्यायी मतदारसंघ म्हणून श्रीगोंदा मतदारसंघाकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे. मात्र, कार्डिले श्रीगोंद्यात आल्यास आ. बबनराव पाचपुते काय करणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

MLA Sangram Jagtap: खुशखबर! नगरमध्ये २० इलेट्रिक बस धावणार; आमदार जगताप काय म्हणाले पहा…

अहमदनगर | नगर सह्याद्री नगर एमआयडीसी मधील कामगारांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस...

Politics News: पारनेरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! ‘यांनी’ दिला मोठा इशारा

Politics News: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर मतदारसंघात (Parner-Nagar Matadarasaṅgha) महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण...

Badlapur encounter case: बदलापूर एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; अक्षय शिंदेवर गंभीर गुन्हा दाखल

मुंबई | नगर सह्याद्री:- बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) पोलीस...

Ahmednagar Rain Update: परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले!

नगर, पारनेर, राहुरीत दमदार पाऊस | सरासरी १२९ मिलीमीटर पावसाची नोंद अहमदनगर | नगर सह्याद्री:- परतीच्या...