Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली आणि गायक रॉकी मित्तल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील कसौली येथील हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेवर दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
विवाहित महिला मैत्रिणीसोबत कसौली येथील एका हॉटेलमध्ये राहात होती. तिथे 3 जुलै 2023 रोजी त्यांनी हरियाणा भाजपचे प्रमुख मोहनलाल बडोली आणि गायक जय भगवान उर्फ रॉकी यांची भेट घेतली. दोघांनी तिला सरकारी नोकरी देतो आणि अल्बमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी देतो असे आमिष दाखवले.
जेव्हा पीडिता त्यांच्या प्रभावाखाली आली तेव्हा त्यांनी तिला दारू पिण्यास भाग पाडले. पीडितेने नकार दिल्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एवढेच नाही तर आरोपींनी त्यांच्या गैरकृत्याचा व्हिडिओही बनवला. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले. त्यांनी पीडितेला जीवे मारण्याच्या धमक्याही देखील दिल्या.
यानंतर पीडितीने या त्रासाला कंटाळून शेवटी १३ डिसेंबर २०२४ रोजी कसौली येथील पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत भाजप नेता आणि रॉकीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गायक रॉकीने महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत. मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.