नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय डेंटल परिषदेमध्ये स्वीकारला पुरस्कार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर इंडियन डेंटल शाखेने राज्यात चांगली कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय डेंटल परिषदेमध्ये देण्यात आला. डॉ वसंत कोटक स्मृती चषकाने गौरव करण्यात आला. यावेळी नांदेड चे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी आहिल्यानगर शाखेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा कुलकण, सचिव डॉ. नेहा जाजू, उपाध्यक्षा डॉ. पायल धूत, डॉ. शिल्पा इनमुलवार (थऊउ कएऊ), डॉ. सोनम मुथीयान (एउढड कएऊ), आदी सह डेंटल चे राज्यअध्यक्ष डॉ. विष्णुदास भंडारी, सचिव डॉ. विकास पाटील, डॉ. राजेश गोंधळेकर आदींसह राज्यभरातून डेंटल परिषदेसाठी आलेले नामवंत डॉक्टर सहभागी झाले होते.
यावेळी नांदेड चे जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले कि आहिल्यानगर च्या इंडियन डेंटल शाखा खरोखरच पुरस्कारास प्राप्त ठरल्या आहेत. शाखेच्या सर्व पदाधिकारी या महिला असल्याने त्यांनी आपल्या कार्यांने संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला तो खरोखरच कतुकास पात्र आहे. सध्या दंत वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने वेगवेगळे बदल होताना दिसत आहे. येथील राज्यस्तरीय सेमिनारच्या माध्यमातून निश्वितच सर्व दंत वैद्यकीय यांना खूप काही शिकण्यासाठी मिळेल असे ते म्हणाले.
यावेळी आहिल्यानगर शाखेच्या अध्यक्षा डॉ. मनिषा कुलकण म्हणाल्या कि आम्ही सर्व पदाधिकारी यांनी शहरच नव्हे तर जिल्हात ठिकठिकाणी जाऊन डेंटलचे विविध शिबीरे घेतले, रुग्णावर उपचार केले, विविध स्वयंसेवी संस्थांना मदत केली त्यामुळेच आम्ही प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवू शकलो हे यश आमच्या सर्व महिला पदाधिकारी यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. सचिव डॉ. नेहा जाजू म्हणाल्या कि आमच्या डेंटल शाखेने आजपर्यंत अनेक शालेय विद्याथ यांची दंत तपासणी करून त्यांचेवर उपचार केले तसेच विविध आरोग्य शिबिरे, मतदान जनजागृती अभियान, रक्तदान, वृक्षारोपण, आदी प्रमुख उपक्रम राबविले तसेच आमच्या शाखेने पुणे (चाकण) येथे राज्यस्तरीय डेंटल परिषदेचे सुद्धा आयोजन केले होते. आहिल्यानगर च्या इंडियन डेंटल शाखेला राज्यात प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल शाखेच्या महिला पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.