spot_img
ब्रेकिंगशासनाकडून गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

शासनाकडून गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्व पाहता गायीला विशेष दर्जा देण्यात आला.

देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पुर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते. परंतू मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता- गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...

अधिवेशनात गदारोळ! काँग्रेसचे आमदार नाना पटोले निलंबित; कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे आमदार...

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...