spot_img
अहमदनगरस्टेट बँक चौक ते मेहेकरी रस्त्याचे काम निकृष्ट? सामाजिक कार्यकर्ते पोटेंसह गावकऱ्यांनी...

स्टेट बँक चौक ते मेहेकरी रस्त्याचे काम निकृष्ट? सामाजिक कार्यकर्ते पोटेंसह गावकऱ्यांनी पाडले काम बंद

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : नगर शहरालगत असणाऱ्या स्टेट बँक चौक, शहापूर, मेहेकरी रस्त्यावरील खड्ड्यात पडून आतापर्यंत अनेक बळी गेलेले आहेत. लोकांचे जीव घेणारे हे खड्डे बुजून रस्ता दुरुस्ती करावी या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक वेळा राष्ट्रीय महामार्गाच्या उपभियंतांच्या दालनात आंदोलने केलेली आहे. या आंदोलनाची दखल घेत या रस्त्याच्या कामासाठी ६० लाखांचा निधी मंजूर झाला.

या खड्डे बुजवण्याच्या कामाला दोन दिवसांपासून सुरुवात करण्यात आली. मात्र शहापूर येथील पेट्रोल पंपा समोर खड्डे बुजवीत असताना खडीमध्ये मातीचे मोठे प्रमाण असून डांबर चिटकत नव्हते त्यामुळे सदर कामाची पाहणी ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह कृष्णा बेरड, रामदास लगड, राम बेरड, ज्ञानदेव काळे, भानुदास नाटक, अरुण नाटक आदीसह गावकऱ्यांनी केली.

एक दिवसापूर्वी बुजवलेले खड्डे हाताने व खोऱ्याने सहज उकरले जात होते. त्यामुळे हे निकृष्ट दर्जेचे काम तातडीने बंद करण्यात आले व अधिकाऱ्यांना बोलवून अधिकाऱ्यांनी देखील निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर...

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना...