spot_img
अहमदनगरमहापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; पालकमंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा...

महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; पालकमंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा…

spot_img

पालकमंत्री राधाकृष्ण विखे | नूतन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचा मुंबईत सत्कार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

भाजपच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे व संघाचे अनुभवी कार्यकर्ते अनिल मोहिते यांची निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक वाढेल. आता लवकरच महानगरपालिकेच्या व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत. भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने या निवडणुका लढणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरातून महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी करा. शहरात पक्षाचे उत्कृष्ट काम सुरु आहे ते अजून वाढवा, अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अनिल मोहिते यांना शुभेच्छा दिल्या.

अहिल्यानगर भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचा मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी शहर भाजपाचे पदाधिकारी अशोकराव गायकवाड, धनंजय जाधव व निखिल वारे उपस्थित होते.

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस अनिल मोहिते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अनिल मोहिते म्हणाले, महाविद्यालयीन काळापासून स्व.गोपीनाथ मुंडे यांचा सहवास मला लाभला आहे. त्यावेळी स्व.राजाभाऊ झरकर यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत भाषण करण्याची संधी मला मिळाली होती. से.मुंडे यांचे विचार व कार्यावर पक्षाचे संघटनात्मक काम करणार आहे, असे सांगून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलेल्या शुभेच्छा व केलेला सत्कार हुरूप व उत्साह वाढवणारा आहे. पक्षाने माझ्यावर मोठा विश्वास व्यक्त करत जबाबदारी दिली आहे. ती निष्ठेने निभावत सर्वाना बरोबर घेत काम करणार आहे, असे सांगितले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...

सिस्पेतील चोरांना पाठीशी घालणारा मोर कोण?; डॉ. विखेंनी साधला खा. लंकेंवर निशाणा

ठेवीदारांच्या पैशासाठी उपोषण का केले नाही? नामोल्लेख टाळत थेटपणे खा. नीलेश लंके यांच्यावर निशाणा...

राजे शिवाजी पतसंस्थेत ८१ कोटी २५ लाखांचा झोल; ४६ जणांची यादीच आली समोर

अपहारास जबाबदार असणार्‍या ४६ जणांची यादीच आली समोर | संचालक मंडळाला आझाद ठुबेने फाट्यावर...

शरद पवारांचा गौप्यस्फोट, राजकारणात मोठी खळबळ

विधानसभेपूर्वी १६० जागांची 'त्या' दोघांनी गॅरेंटी दिलेली नागपूर / नगर सह्याद्री : विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं...