spot_img
देशमहाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता, शाही स्नान थांबवण्याचा निर्णय

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता, शाही स्नान थांबवण्याचा निर्णय

spot_img

प्रयागराज | नगर सह्याद्री:-
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात एकाच वेळी मोठी गद झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री 1 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत अनेक भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या चेंगराचेंगरीत 17 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी दुसरे शाही स्नान पार पडणार आहे. त्यामुळे भाविकांनी मध्यरात्री त्रिवेणी संगमावर मोठी गद केली. काही भाविकांनी बॅरिकेट तोडल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. यात अनेक भाविक जण जखमी झाले, तर जवळपास 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही याची पुष्टी केलेली नाही. या घटनेनंतर रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही मिनिटांतच पोलिसांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली.

त्रिवेणी संगमाजवळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली होती. काही बॅरिकेट तुटले. एकाच ठिकाणी मोठी गद निर्माण झाल्यानं हा प्रकार घडला. जखमींना आम्ही रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात कुणीही गंभीर जखमी नाही, अशी माहिती कुंभमेळ्याच्या अधिकारी आकांक्षा राणा यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर आता आखाडा परिषेदेने शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आम्ही आज शाही स्नान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण कुंभमेळा परिसरात लाखो भाविक आले आहेत.

या पार्श्वभूमीवर आजचे स्नान रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली.पंतप्रधान मोदींनी या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकार या घटनेकडे लक्ष ठेऊन असल्याचं त्यांनी सांगितले.

रुग्णावाहिकेला लागली आग
उत्तर प्रदेशातील महाकुंभ येथील संगम घाटावर मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकांनी जीव गमावला. तर काही नागरिक जखमी झाले आहे. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर रुग्णांच्या सेवेकरता कार्यरत असलेल्या एका रुग्णावाहिकेलाच आग लागल्याचीही घटना घडली आहे. रुग्णवाहिकेच्या चालकाच्या केबिनमध्ये ही आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न होत असल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. ही घटना कळताच प्रशासकीय अधिकारी आणि अग्निशमन ब्रिगेड टीम घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाच्या पथकाने रुग्णवाहिकेच्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. परंतु आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रयागराजमधील परिस्थिती नियंत्रणात: योगी आदित्यनाथ
आज प्रयागराजमध्ये सुमारे 8-10 कोटी भाविक उपस्थित आहेत. संगम नाक्याच्या दिशेने भाविकांच्या हालचालीमुळे सतत दबाव आहे. आखाडा मार्गावरील बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न करताना काही भाविकांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे. आत्तापर्यंत चार वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही प्रयागराजमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका, संपूर्ण कुंभ परिसरात भक्तांनी केवळ संगम नाकाकडे जाण्याची गरज नाही. भाविकांनी जवळच्या घाटांवर पवित्र स्नान करावे. आम्ही जखमींना योग्य वैद्यकीय उपचारांची खात्री देत आहोत असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

चेंगराचेंगरीमुळे अमृत स्नान रद्द
मौनी अमावस्येनिमित्त, मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज महाकुंभात स्नानासाठी पोहोचले होते. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, आखाड्यांनी अमृत स्नान कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नाही आणि सर्व आखाड्यांनीही त्यांच्या मिरवणुका छावण्यांकडे परत बोलावल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि धार्मिक संघटनांनी भाविकांना संयम राखण्याचा आणि संगमावर जाण्याऐवजी जवळच्या घाटांवर स्नान करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल.

भाविकांपेक्षा व्हीआयपींवर अधिक लक्ष: राहुल गांधी
चुकीचे नियोजन आणि व्हीआयपी संस्कृती या घटनेला जबाबदार असल्याचे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. तसेच, या घटनेसाठी प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. प्रयागराज येथील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जखमी असलेले लोक लवकर बरे होतील, अशी आशा करतो. दुःखद घटनेला चुकीचे नियोजन आणि सामान्य भाविकांपेक्षा व्हीआयपी हालचालींवर प्रशासनाचे विशेष लक्ष या गोष्टी जबाबदार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहर हादरलं! पती-पत्नीचे आढळले मृतदेह, वाचा प्रकरण

संगमनेर । नगर सहयाद्री: उपनगरातील इंदिरानगर परिसरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. ही घटना रविवारी समोर...

धक्कादायक! फिर्यादीच निघाले आरोपी; विखेंचे बॅनर फाडणारे जेरबंद

शिर्डी । नगर सहयाद्री:- शहरातील लक्ष्मीनगर परिसरात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे...

२१ वर्षांच्या नर्तिकेच्या नादात ३५ वर्षांचा नेता संपला!, कारमध्ये आढळला मृतदेह? शहरात खळबळ..

Maharashtra Crime News: मगळवारी सकाळी एका तरुणाचा कारमध्ये मृतदेह आढळून आला, ज्यामुळे परिसरात खळबळ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार ऑगस्टचा हप्ता खटाखट जमा करणार, वाचा अपडेट..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक...