spot_img
महाराष्ट्र'भिंगार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद'

‘भिंगार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद’

spot_img

भिंगारमध्ये पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून व जाळून पहलगाम घटनेचा केला निषेध
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे गोळीबार करून हत्या केलेल्या हिंदू बंधूभगिनींना श्रद्धांजली वाहण्यासाठी भिंगारच्या सर्व पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या आवाहनाला भिंगार मधील सर्व बाजारपेठेमधील व्यापारी, दुकानदार, छोटे-मोठे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत घटनेचा निषेध केला.

यावेळी भिंगार वेशी जवळ झालेल्या आंदोलनात सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद…, भारतमाता की जय…., जय श्रीराम अशा जोरदार घोषणा दिल्या. तसेच पाकिस्तानचा झेंडा लाखो लोकांच्या पायदळी तुडवला जावा यासाठी भर रस्त्यात चिटकवण्यात आला. तसेच पाकिस्ताचा झेंडा जाळून निषेधही करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक आर. के. दहीफळे यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

भिंगार बंद आंदोलनात प्रकाश लुणिया, संभाजी भिंगारदिवे, सुनील लालबोंद्रे, महेश नामदे, संजय सपकाळ, विष्णू घुले, सचिन जाधव, नामदेव लंगोटे, रवींद्र लालबोंद्रे, संतोष बोबडे, श्याम वाघस्कर आदींसह मोठ्या संखेने सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमूद केले होते, पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी फक्त हिंदू धर्माच्या पर्यटकांनाच धर्म विचारून त्यांची अमानुषपणे हत्या केली.

याचा आम्ही सर्व भिंगारवासीय निषेध करीत आहोत. शहरातील पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांचीही भारतातून हकालपट्टी करावी. शहरातील ज्या ज्या ठिकाणी सरकारी सेतू कार्यालाये व पुरवठा अधिकारी अशा देशद्रोही नागरिकांना भारतीयत्वचे दाखले देत आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी मारुती मंदिर येथे सर्व भिंगारवासी सामूहिक हनुमान चालीसा पाठ करून भिंगार बंदचे आवाहन केले.

संध्याकाळी ठीक 07.30 पूर्ण भिंगार शहरातील सर्व नागरिक दोन मिनिटे आपल्या घरातील व दुकानातील लाईट बंद करून एक पणती श्रद्धांजली साठी लावून काश्मीर येथे मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यावेळी नीलेश साठे, प्रज्योत लुणिया, राजेंद्र फुलारे, बापू लिपणे, नाना मोरे, सुदाम लांडे, लॉरेन स्वामी, रुपेश भंडारी, लोक भंडारी, सोमनाथ आव्हाड आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...