spot_img
आरोग्यspinach : हिवाळ्यात 'ही' भाजी आरोग्यास वरदान ; भरपूर वाढेल इम्युनिटी पॉवर

spinach : हिवाळ्यात ‘ही’ भाजी आरोग्यास वरदान ; भरपूर वाढेल इम्युनिटी पॉवर

spot_img

नगर सह्याद्री टीम : खाण्या-पिण्याच्या दृष्टीने हिवाळा हा ऋतू सर्वांत गुणकारी मानला जातो. या ऋतुत वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या सहज आणि मोठ्या प्रमाणात मिळतात. ज्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतात. पालेभाज्यांमध्ये सर्वांत जास्त पालकच्या भाजीला मागणी असते.

कारण या भाजीत इतर भाज्यांच्या तुलनेत सर्व पोषक तत्त्वे असतात. यामुळे या शरीराला अंतर्गत शक्ती मिळते. या भाजीत 23 टक्के प्रथिने, 91 पाणी, 2.9 टक्के जीवनसत्त्वे, 3.6 टक्के कर्बोदके, 2.2 लोह यासह पालक भाजीत क्षार, जीवन सत्त्वे, लोह, मीठ असा शरीराला पौष्टिक अशा सर्व घटकांचा समावेश असतो. त्यामुळे पालक भाजीचा आहारात नियमित वापर केल्यास ते आपल्या आरोग्यास वरदान तर ठरेलच सोबत आपल्या रोगप्रतिकार शक्तीतही वाढ होईल. त्याच बरोबर त्याचे इतरही पुढील प्रमाणे फायदे आहेत.

डोळ्यांसाठी फायदेशीर
पालक भाजीत जेक्सैन्थिन आणि ल्युटिन मोठ्या प्रमाणात असते. त्यात कैरोटीनॉयड असते. जी डोळ्यांना कोणत्याही धोक्यापासून वाचवतात. अनेक संशोधनानुसार जेक्सैन्थिन आणि ल्यूटिन डोळ्यांना मोतिबिंदू होण्यापासून वाचवतात. पालक भाजीत असणारे जीवनसत्त्वे A म्यूकस मेम्ब्रेन डोळ्यांना सुदृढ ठेवण्यास मदत करते.

कर्करोगापासून वाचवते पालक भाजी
पालक भाजीत MGDG और SQDG असे घटक असतात, जे कर्करोगाच्या विकासाची गती मंदावतात. एका अभ्यासानुसार पालक भाजीमुळे ट्यूमर सारख्या रोगच्या आकाराचा क्ष्य होण्यास ही मदत होते. पालक पुरुषांना होणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगाच्या संभावना ही कमी करते. याशिवाय ब्रेस्ट कर्करोगापासून वाचवते. एका प्राण्यावर केलेल्या अभ्यासानुसार पालक कर्करोगाच्या गाठीला दाबते. पालकमध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात, जी कर्करोगाशी लड़ण्यामध्ये मदत करतात.

रक्तदाबामध्येही फायदेशीर
पालकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाइट्रेट असतात, जे रक्तदाबाच्या स्तराला संतुलित ठेवतात आणि हृदयांच्या आजारापासून वाचवतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, पालक खाण्याने रक्तदाबाचा स्तर प्रभावीपणे कमी होतो. ते हृदयाला सुदृढ ठेवते. पालकमध्ये पोटॅशियम असतात आणि त्यात सोडियमची मात्रा खूप कम असते. यामुळे रक्तदाबाच्या रुग्णास पालक भाजी नियमित खाणे गरजेचे आहे.

रोगप्रतिकार शक्तीवर्धक पालक
हिवाळ्याच्या ऋतुत लोक सततच्या सर्दी आणि खोकल्याने त्रासून जातात. पालक भाजी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम करते. प्रतिकार शक्तीच्या यंत्रणेला मजबूत बनवते. यामुळेच आरोग्यतज्ज्ञ हिवाळ्यात नेहमी पालक भाजी खाण्याचा सल्ला देतात. ही भाजीत केवळ बीटा आणि कैरोटिनच नाही तर यात एंटीऑक्सिडेंट सह क जीवनसत्त्वे ही मोठ्या प्रमाणात असतात. जी अनेक रोगांच्या संक्रमणापासून बाधित होण्यापासून वाचवतात.

हिमोग्लोबिनमध्ये वाढ करते पालक
ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनचा स्तर कमी असतो,त्यांनी आहारात नियंत्रणात पालक भाजीचा समावेश जरूर करावा. पालकमध्ये फोलेट भरपूर असतात, जी रक्तीतील तांबड्या पेशींत वाढ करण्यात मदत करतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मागण्या पूर्ण, आंदोलन संपले; नुकसानीचे काय?; न्यायालयाची जरांगे, आयोजकांना विचारणा

मुंबई / नगर सह्याद्री - मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मराठा नेते मनोज जरांगे...

एमआयडीसीत बाप्पाला निरोप; पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात रंगली विसर्जन मिरवणुक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - एमआयडीसी परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव मंगलमय...

मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेना हरकती घेणार : शहरप्रमुख काळे

इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर...

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...