spot_img
अहमदनगरभरधाव ट्रकने 'इतक्या' वाहनांना उडविले; अहमदनगर मधील दुर्घटना

भरधाव ट्रकने ‘इतक्या’ वाहनांना उडविले; अहमदनगर मधील दुर्घटना

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील पांढरीपूल घाटातील तीव्र उतारावरून भरधाव जाणाऱ्या ट्रकने सहा वाहनांना उडविले. अपघातात २० जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. २९) घडली. पांढरीपूल घाटातील तीव्र उतारावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच १६ सीसी ४३४३) पांढरी पूल येथे समोर जात असलेल्या चार कार, एक मालवाहतूक टेम्पो व एक दुचाकीस धडक दिली.

अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र जखमींचा आरडाओरडा सुरू होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. धडक एवढ्या जोराची होती की दोन कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने फेकल्या गेल्या. अपघातात सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात काही गंभीर जखमी झाले आहेत, तर काहींना किरकोळ मार लागला आहे.

घाटातील तीव्र उतारावर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक दोन किलोमीटर अंतरावरील हॉटेलवर पार्किंग करून फरार झाला. घटनास्थळी सोनई पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींवर नगर येथील खासगी तसेच काहींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...