spot_img
ब्रेकिंगसरकार स्थापनेला वेग! आ. दादा भुसे होणार उपमुख्यमंत्री? अजित पवार...

सरकार स्थापनेला वेग! आ. दादा भुसे होणार उपमुख्यमंत्री? अजित पवार…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड करण्यासाठी बैठकांचे सत्र चालू झाले आहे. या निवडणुकीत भाजपा हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे यावेळी महायुतीत मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? राज्यात एक की दोन उपमुख्यमंत्री? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

असे असतानाच आता मोठी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार नसल्याने भुसे यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दादा भुसे सलग पाचव्यांदा आमदार झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय अशी दादा भुसे यांची ओळख आहे.

एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेत दाद भुसे हेच ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदावर दादा भुसे यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळआत सुरु आहे. आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...