spot_img
महाराष्ट्रसभापती राम शिंदे यांना धक्का!; 'ते' पद राष्ट्रवादीच्या ताब्यात

सभापती राम शिंदे यांना धक्का!; ‘ते’ पद राष्ट्रवादीच्या ताब्यात

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
कवडगाव-गिरवली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल दादा राळेभात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे मिठु महादेव खोसे यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारास जोरदार टक्कर दिली. यावेळी एक मत बाद होवून दोन्ही उमेदवारांना समान ६-६ मते पडली यानंतर चिट्ठी द्वारे मिठू खोसे यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली.

या निवडणुकीमध्ये मंगेश दादा आजबे, संपत नाना राळेभात, शहाजी राळेभात, प्रशांत राळेभात, सखाराम भोरे, नाना आढाव यांनी केलेल्या विशेष सहकार्यामुळे मागील ३ वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली ही संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. अटीतटीच्या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित चेअरमन श्री. मिठू महादेव खोसे यांचा सत्कार जिल्हा सहकारी बँकेच्या जामखेड येथील लोकनेते सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात पाटील सभागृहात करण्यात आला.

यावेळी बोलताना बँकेचे संचालक अमोल दादा राळेभात यांनी स्पष्ट सांगितले कि, मागील ३ वर्षाच्या कार्यकाळात दोन्ही गावातील अनेक नवीन सभासदांना पिक कर्जापासून वंचित ठेवले आहे अशा सर्व सभासदांना संस्थेचे नवीन सभासद करून घेवून तत्काळ पिक कर्ज वितरण करण्यात येईल तसेच बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कर्ज योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोचविल्या जातील असे ठामपणे सांगून कवडगाव गिरवली संस्थेस सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,असे आश्वासन दिले.

यावेळी मार्केट कमेटीचे मा.सभापती व विद्यमान संचालक सुधीर दादा राळेभात, अभिमन्यू खोसे, सखाराम भोरे, नाना आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी कोंडीबा चोरखले, हरिश्चद्र भोईटे, सीताराम कांबळे, संगीता नन्नवरे, महादेव भोरे हे संचालक तसेच गावातील वचिष्ठ खोसे, पप्पू खोसे, युवराज खोसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...