श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील काष्टी गावाजवळ सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा श्रीगोंदा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. छापा टाकून दारू तयार करण्यासाठी वापरली जाणारी तुरटी, काळा गूळ, चारचाकी वाहनासह 51 लाख 59 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अजनूज रोडच्या लगत राहुल दामोदर बनसोडे हा रावसाहेब वामनराव पाचपुते यांचे शेतात गावठी हातभट्टीची दारु तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीस छापा टाकला. याप्रकरणी विशाल रावसाहेब पाचपुते, दिपु राम विलास, गणेश रामबालक शंकर, मनोजकुमार रामपाल सिंग यांना ताब्यात घेत 51 लाख 59 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लिमकर, पोकॉ.संदिप शिरसाठ, पोकॉ, मनोज साखरे, पोकॉ, अरुण पवार, पोकॉ गणेश साने, पोकॉ. योगेश भापकर, मपोकॉ अरुणा खेडकर यांनी कारवाई केली.