spot_img
मनोरंजनसलमान खानला माफ करा! " मी राखी सांवत, सलमान खानच्यावतीने माफी..." राखी...

सलमान खानला माफ करा! ” मी राखी सांवत, सलमान खानच्यावतीने माफी…” राखी सांवतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

spot_img

Rakhi Sawaant Video Viral: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या जबरदस्त चर्चेत आहे. अभिनेता हा त्याच्या चित्रपटामुळे नाही तर वैयक्तिक घडामोडींमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीची हत्या झाली. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या जिवाला देखील धोका असल्याची माहिती आहे. अशातच आता बॉलिवूडची कॉमेडीक्वीन राखी सांवतचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राखीने तिच्या व्हिडीओमध्ये, “नमस्कार मी राखी सांवत, सलमान खानच्यावतीने मी बिश्नोई समाजाची माफी मागते. प्लिज तुम्ही त्याला माफ करा. सलमान खान माझा भाऊ आहे. त्याच्या वतीने मी माफी मागते. प्लीज माझ्या भावावर वाईट नजर ठेवू नये. प्लीज त्याला माफ करा. तो गरीबांचा अन्नदाता आहे. त्याला माफ करा.” असं राखीने सांगितलं आहे. राखीने मीडियासमोर उठा-बश्या काढत बिश्नोई गँगची माफी मागितली आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक
https://www.instagram.com/reel/DBEk04bO9ic/?utm_source=ig_embed&ig_rid=6781cd86-95c1-4019-8203-a160b11267e6

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची हत्या झाल्यानंतर सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अभिनेता सलमान खानसोबत जो कोणी असेल त्याने सावध राहा असा तो संदेश होता. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सलमानने काळवीट या प्राण्याची शिकार केल्याचं सागितलं जात आहे. तेव्हापासून सलमान खान हा अडचणीत आहे. काळवीट बिश्नोई समाजासाठी पवित्र मानला जातो. या घटनेनंतर बिष्णोई समाजाने तीव्र संताप व्यक्त केला होता. तेव्हापासून बिष्णोई समाजाकडून सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...