spot_img
आर्थिकज्वारीला सोन्याचे दिवस ! ७ हजार रुपये क्विंटल भाव

ज्वारीला सोन्याचे दिवस ! ७ हजार रुपये क्विंटल भाव

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री :
पावसाची कमतरता, कमी खरीप पिकांची झालेली दुरवस्था भुसार मालाकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ यामुळे ज्वारीला सोन्याचे दिवस आलेत. ज्वारीच्या किमती गगनाला भिडल्या आहे. यंदा ज्वारीच्या किमती अगदी ७ हजार रुपये क्विंटल पर्यंत गेल्या आहेत. पाथर्डी बाजरात बुधवारी (दि.१३ डिसेंबर) ज्वारी ७१०० रुपये क्विंटल विकली गेली. ज्वारीसोबतच गहू व बाजरीच्या किमती देखील वाढल्या आहेत.

* नगदी पिके घेण्यावर भर
पावसाच्या लहरीपणामुळे, मजुरांच्या समस्येमुळे शेतकरी नगदी पिके घेण्यावर भर देत आहे. सध्या शेतकऱ्याने भुसार मालाकडे पाठ फिरवली आहे. आगामी काळात धान्य टंचाईची तीव्रता अधिक वाढून ज्वारी साधारण ९ हजार रुपये क्विंटल पर्यंत जाईल अशी शक्यता आहे. वर्षभरापासून ज्वारी, बाजरी व गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झाली असून ऊस, कापूस, तूर, सोयाबीन या नगदी पिकांकडे शेतकरी वळले आहेत. सध्या माल थोडा आहे. ज्यांच्याकडे थोडाफार माल आहे, ते विक्रीला आणायला तयार नसल्याने माल कमी व मागणी जास्त झाली आहे.

* ज्वारीसह गहू , बाजरी देखील महागली
ज्वारीचे भाव तर गगनाला भिडले आहेतच. सोबतच गव्हासह बाजरीचे भावही कडाडले आहेत. आठवडे बाजारात बाजरी ३०००, तर गहू साडेतीन हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...