spot_img
अहमदनगरनिघोजच्या सोनुचा मृतदेह दगडी खाणीत आढळला!

निघोजच्या सोनुचा मृतदेह दगडी खाणीत आढळला!

spot_img

निघोज । नगर सहयाद्री:-
निघोज गावातील एका २४ वर्षांच्या तरूणाचा मृतदेह सोमवार दि. २४ रोजी शिर्डी लगत असणाऱ्या सावळीविहीर गावात आढळून आला आहे.वैभव उर्फ सोनु धाकराव असे तरूणाचे नाव आहे. या घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापयरत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

निघोज गावातील वैभव उर्फ सोनु धाकराव घरातून बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात कटुबीयांनी दिली होती. दरमायन, सावळीविहीर गावात नाशिककडे जाणार्‍या रोड लगत असणार्‍या दगडी खाणीत सोमवार दि. २४ रोजी एका २४ वर्षांच्या तरूणाचा मृतदेह आढळला. पोलीस निरीक्षक रणजित गंलाडे व पोलीस पथकाने घटनेनंतर सबंधित मृतदेहाची ओळख पटवली.

शिर्डी अग्निशमन पथक व शिर्डी पोलीस यांनी अथक प्रयत्न करून सोमवारी मयत झालेल्या तरूणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्या तरूणाला पत्नी व दोन वर्षे वयाचा मुलगा आहे. याअगोदर देखील याच खाणीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे या ठिकाणी असे प्रकार वारंवार घडत असून या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...