spot_img
अहमदनगरसोमनाथ घार्गे अहिल्यानगर चे नवीन पोलीस अधीक्षक; राज्यातील 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या...

सोमनाथ घार्गे अहिल्यानगर चे नवीन पोलीस अधीक्षक; राज्यातील 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

spot_img

 

पुणे / नगर सह्याद्री –
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु झाला आहे. राज्यात आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या निर्णयाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. अहिल्यानगर चे नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे असणार आहेत.

आज गुरुवारी २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या बड्या निर्णयाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधिक्षक मिळाले आहेत.

 

कुणाची कुठे बदली झाली?
कोकण विभागातील रत्नागिरी, मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. आंचल दलाल यांची रायगडच्या नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदावर तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन बगाते यांचे रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. आहे. रितू खोकर यांची धाराशिवचे पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

अर्चित चांडक यांच्याकडे अकोल्याचे पोलिस अधीक्षकपद सोपवण्यात आलं आहे. तर योगेश कुमार गुप्ता यांची कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. जयंत मीना यांची लातूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत युवकावर कोयत्याने हल्ला; असा घडला प्रकार

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळ जवळ, माताजीनगर येथे एका युवकावर जुन्या...

पारनेरला पावसाने झोडपले; कुठे कुठे झाला पाऊस, पहा

कान्हूर पठार, तिखोल, टाकळी ढोकेश्वर भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साह पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...

पावसाळा! महापालिका अलर्ट, असे केले नियोजन…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून चारही प्रभाग समिती कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन...

आता जिल्ह्यातील १५७५ गावांत मिळणार शुद्ध पाणी; कसे ते पहा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासण्यासाठी ७ जून...