मुंबई । नगर सहयाद्री:-
विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर राजकीय वादंग उभा राहिला आहे. शिंदेसेनेने खार येथील सेटवर तोडफोड करत कुणाल कामरा याला इशारा दिला आहे. कुणाल कामरा याने माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. दरम्यान, आमदार उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के यांनी कुणाल कामरा याला इशारा दिला आहे. कामरा मुंबईहून फरार झाल्याचं वृत्त समोर आलं असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.
कुणाल कामरा याने आपल्या स्टँडअप शोमध्ये महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित एक विडंबनात्मक गाणं सादर केलं. यानंतर ‘द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल’मध्ये असलेल्या कुणालच्या स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी घुसून तोडफोड केली. यासोबतच शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी ट्विटरवर सकाळी 11 वाजता कामराला चोपण्याची धमकीही दिली.
तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आणि पोलिसांनी खार व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कुणाल कामराच्या या गाण्यामुळे निर्माण झालेला तणाव वाढत चालला आहे. त्याच्याविरोधात राजकीय स्तरावरही संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अधिक चिघळत आहे.
कुणाल कामरा याचं नेमकं गाण काय?
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं महाराष्ट्राच्या राजकारणावर कविता सादर केली. त्याने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कविता सादर केली. कामरा याने आपल्या कवितेत म्हटले की, शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. हा प्रकारात सर्वच कन्फूज झाले. हा प्रकार एकाने सुरु केला होता, असे सांगत गाण्याचे बोल सुरु होतात. ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये….पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंडुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।