spot_img
अहमदनगरकही खुशी, कही गम! नगर तालुक्यातील १०५ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण...

कही खुशी, कही गम! नगर तालुक्यातील १०५ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण सोडत बुधवारी येथील येथील न्यू आर्ट्‌‍स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या राजष शाहू महाराज सभागृहात काढण्यात आली. सन 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964च्या कलम 02 नुसार हे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. 23 रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये पुरुष की महिला याची सोडत गुरुवार 24 रोजी काढली जाणार आहे.

नगर तालुक्यातील सरपंच पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवलेली 53 गावे पुढील प्रमाणे आहेत. शिंगवे व इस्लामपूर, विळद, निमगाव घाना, पिंपळगाव उज्जैनी, शेंडी, पोखड, बुऱ्हाणनगर, कापूरवाडी, निमगाव वाघा, जखणगाव, पिंपळगाव वाघा, दरेवाडी, वाकोडी, सोनेवाडी (चास), चास, दशमी गव्हाण, निंबोडी, कोल्हेवाडी, वडारवाडी, बाराबाभळी, भातोडी पारगाव, कौडगाव व जांब, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी (पिं. लां), खांडके, माथणी व बाळेवाडी, वाळकी, बाबुड घुमट, आगडगाव, रतडगाव, देवगाव, वडगाव गुप्ता, नवनागापूर, घोसपुरी, बाबुड बेंद, टाकळी काझी, उक्कडगाव, मदडगाव, हिवरेझरे, दहीगाव, साकत खुर्द, राळेगण, वडगाव तांदळी, गुणवडी, वाटेफळ, तांदळी वडगाव, अंबीलवाडी, खोसपुरी, नागरदेवळे, नेप्ती, हिंगणगाव, बारदरी, हातवळण.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सरपंच पदासाठी आरक्षित झालेली 28 गावे पुढीलप्रमाणे आहेत. पिंप्री घुमट, रांजणी, शिराढोण, रुईछत्तीसी, गुंडेगाव, इसळक, मांजरसुंबा, ससेवाडी, बहिरवाडी, निंबळक, हमीदपूर, पिंपळगाव कौडा, वाळुंज, खडकी, मेहेकरी, शहापूर केकती, देऊळगाव सिद्धी, मठपिंप्री, सारोळा बद्दी, डोंगरगण, कर्जुने खारे, इमामपूर, अरणगाव, पारगाव मौला, नारायणडोहो, खंडाळा, उदरमल, नांदगाव व कोळपे आखाडा ग्रुप ग्रामपंचायत.
अनुसूचित जातींसाठी सरपंच पदासाठी आरक्षित झालेली 13 गावे पुढीलप्रमाणे आहेत. सांडवे, कामरगाव, टाकळी खातगाव, सारोळा कासार, आठवड, मांडवे, अकोळनेर/जाधववाडी, हिवरेबाजार, चिचोंडी पाटील, पांगरमल, वारूळवाडी, धनगरवाडी, भोरवाडी.

अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आलेली चार गावे पुढीलप्रमाणे आहेत. पिंपळगाव माळवी, जेऊर, खातगाव टाकळी, देहरे. आरक्षण कायम ठेवण्यात आलेल्या सात गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. भोयरे खुर्द (अनुसूचित जाती स्त्री), पारेवाडी पारगाव (अनुसूचित जाती स्त्री), बुरूडगाव (अनुसूचित जाती स्त्री), पारगाव भातोडी (सर्वसाधारण), भोयरे पठार (सर्वसाधारण स्त्री), मजले चिंचोली (सर्वसाधारण स्त्री), आव्हाडवाडी (सर्वसाधारण).

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...