आ. काशिनाथ दाते । रेनवडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
पारनेर । नगर सहयाद्री
महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून झटून काम केल्यामुळे पारनेर-नगर विधानसभा निवडणुकीत विजय झाल्याचा गौरवोद्गार आ. काशिनाथ दाते यांनी काढले. माजी उपसरपंच बाबासाहेब येवले यांच्या नेतृत्वाखाली आ. काशिनाथ दाते, आ. शरद सोनवणे यांचा रेनवडी ग्रामस्थांच्या वतीने पेढे तुला व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते विश्वनाथ कोरडे होते.
नागरी सत्कार व पेढे तुला सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. काशिनाथ दाते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, तालुकाध्यक्षा सोनाली सालके, तालुका उपाध्यक्ष अतुल माने, जिल्हा कार्यकारिणी सदस्य किसनराव शिंदे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, माजी सरपंच भाऊसाहेब डेरे, रखमाजी कापसे, अपर्णाताई खामकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. सन्मान सोहळ्याप्रसंगी रेनवडी ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात नवसपूर्तीसाठी पेढे तुला करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वनाथ येवले, हनुमंत डेरे, राजेंद्र डेरे, गणेश डेरे, ज्ञानदेव डेरे, शरद येवले, राहूल येवले, राजाराम येवले, बाळासाहेब येवले, भाऊसाहेब येवले, कैलास येवले, संदीप भोर, पवन भोर, संदीप गोसावी, पोपट दाते आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. राजेंद्र डेरे यांनी सूत्रसंचालन केले व उपसरपंच बाबासाहेब येवले यांनी आभार मानले.
सरपंच येवले यांनी केली विविध कामांची मागणी
कुकडी नदीवरील पूल, पिंपरी कावळ हद्दीतील जेजुरी राज मार्ग ते बंधाऱ्याचा १ किलो मीटर रस्त्याचे डांबरीकरण, मंगरूळ शिव ते शंकरवाडी, म्हस्केवाडी ५ किलो मीटर रस्ता डांबरीकरण, हनुमान मंदिरासमोरील सभा मंडप, गावठाण ते बंधारा रस्ता डांबरीकरण , जांभळी मळा रस्ता डांबरीकरण इतर कामांची मागणी करण्यात आली.
रेनवडीचा चेहरा मोहरा बदलणार
राज्यात व केंद्रात आपले सरकार आहे. त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. चालू आर्थिक वर्षात नवडी बंधारा रस्ता, जांभळी मळा रस्ता, हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम पूर्ण करून रेनवडीचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आ. काशिनाथ दाते यांनी जाहीर केले.
रेनवडीतून सर्वात जास्त मताधिक्य
महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून केलेल्या कामामुळे विधानसभा निवडणुकीत विजय झाला. निघोज जिल्हा परिषदेच्या गटामध्ये सर्वात कमी मतदार संख्या असलेल्या रेनवडी गावातून सर्वात जास्त मताधिक्य मिळाले असल्याचे सागत आ. काशिनाथ दाते यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आ. काशीनाथ दाते सर यांच्या हस्ते सन्मान
जिल्हा परिषदेच्या रेनवडी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. समृद्धी राजाराम येवले हिने जिल्हा स्तरीय उंच उडी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल आणि प्रथमेश पवार याचा तालुका स्तरीय उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल आ. काशीनाथ दाते सर याच्या हस्ते त्यांचा सन्मान करून कौतुक करण्यात आले.