spot_img
अहमदनगरAhmednagar.. तर 'त्या' कामाचे व्हिडिओ व्हायरल करेल! 'झेड पी' मध्ये तोडफोड करणाऱ्यावर...

Ahmednagar.. तर ‘त्या’ कामाचे व्हिडिओ व्हायरल करेल! ‘झेड पी’ मध्ये तोडफोड करणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असून त्याचे व्हिडीओ शुटींग व्हायरल करायचे नसल्यास प्रत्येक कामासाठी २५ हजार रूपये द्यावे लागतील, अशी मागणी शासकीय कंत्राटदाराकडे केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी कंत्राटदार मोहसीन पिरमहंमद शेख (वय ३२ रा. मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जन आधार सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष प्रकाश मोहन पोटे (रा. निंबोडी ता. नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शेख शासकीय ठेकेदार असून त्यांनी नगर तालुयातील हातवळण व कोल्हेवाडी येथील जलजीवन मिशनचे काम घेतले होते. हातवळण येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम मार्च २०२३ रोजी पूर्ण झाले आहे. ५ जानेवारीला दुपारी दोनच्या सुमारास शेख व लेबर ठेकेदार संजय शिवाजी लांडगे यांना जिल्हा परिषदेच्या गेटवर प्रकाश पोटे भेटला.

त्यांना म्हणाला, तुम्ही हातवळण व कोल्हेवाडी येथे केलेले जलजीवन मिशन पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, तुम्ही केलेल्या कामाचे माझ्याकडे व्हिडिओ शुटींग आहे. तुम्ही मला प्रत्येक कामासाठी २५ हजार रूपये द्या, नाहीतर मी तुम्ही केलेल्या जलजीवन मिशन कामाचे व्हिडिओ व्हायरल करीन. तुमची चौकशी लावील’, अशी धमकी देत खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...