Politics News: बीडमधील सध्याची परिस्थिती आणि तेथील वाढत्या गुन्हेगारीवरून शरद पवार यांनी तेथील राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केल्यामुळे तेथील परिस्थिती तशी झालीय. आधी बीड जिल्हा असा नव्हता, असं म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. राज्यात काही ठिकाणी परिस्थिती बिघडलीय. धर्मांवरून तेढ निर्माण करण्याचे कामे केली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
शरद पवार यांनी बारामतीत गोविंद बागेतील निवासस्थानी नागरिकांची भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बीड आणि राज्यातील परिस्थितीवरून त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले. बीड जिल्हा असा कधीच नव्हता. सर्व राजकारण्यांसोबत घेऊन धरून चालणारा जिल्हा होता. परंतु जिल्ह्यातील काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला, त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तेथे अशी परिस्थिती निर्माण झालीय. राज्य सरकारने याकडे दिलं पाहिजे, फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये. कायदा हातात घेणारा जो कोणी असेल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बीडमध्ये पुवचे दिवस, कसे येतील ते पाहवं, असं शरद पवार म्हणालेत.
राज्यातील विविध प्रश्नाबांबत माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आमदार जयंत पाटील पक्षाला सोडून जाणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी आपले मत मांडले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी मस्साजोगला भेट दिली होती. तसेच देशमुख कुटुंबीयांशी संवादही साधला होता. वैभवी देशमुख हिचा शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलणार असल्याचे पवार त्यावेळी म्हणाले होते. त्यानुसार बारामतीमध्ये तिच्या शिक्षणाची पूर्ण सोय करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. अंजली दमानिया यांनी केजच्या न्यायाधिशाचे होळी खेळतानाचा फोटो शेअर केला, यावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी भाष्य करणे टाळले असल्याचे पाहायला मिळाले.