spot_img
महाराष्ट्र..तर न पडणाराही पडेल! 'तो' गनिमी कावा कळूच देणार नाही; मनोज जरांगे...

..तर न पडणाराही पडेल! ‘तो’ गनिमी कावा कळूच देणार नाही; मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा दिला इशारा

spot_img

Manoj Jarange Patil: ” एकजूट कायम ठेवली तर सत्ताही मिळेल आणि कधी न पडणाराही पडेल.” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यासोबतच त्यांनी गनिमी काव्याची शक्यता नाकारण्यासाठी आड होणारी बैठक पुढे ढकलण्याची माहिती दिली. विधानसभा निवडणुकीच्या तारखा आल्यावर उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे ठरवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरु करुन आज एक वर्ष झालं आहे. आज त्यांनी पैठण तालुक्यातील अंबडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.जरांगे पाटील म्हणाले, सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, 24 तास वीज नाही, पाणी नाही असे म्हणत रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा आता निवडणुकीलाच आंदोलन समजा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.

29 ऑगस्ट 2023 रोजी मराठा समाज एकत्र आला. या घटनेला आज वर्षपूर्ती झाली. कितीही मोठे संकट आले तरी एकत्र आलेलं कुटुंब कोणी तोडू शकत नाही आज माझ्या मराठा समाजाला तळमळीने विनंती आहे की, एखादी गोष्ट नाही मिळाली तर चार दिवस लेट मिळेल,पण विजय तुमच्या पायात येऊन पडणार आहे असे जरांगे पाटील म्हणाले.

मी जातीवादी नाही, मी आरक्षण मागत आहे. तुम्ही एकत्र आल्यामुळं मराठा समाजाला आख्ख जग पाहत आहे. श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठा एकमेकांना सहकार्य करु लागलेत. मराठा समाज एकत्रित करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे. त्यांनी दिलेले योगदान वाया जाऊ देणार नाही आज छोटी बैठक आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर भूमिका जाहीर करणार असल्याचे जरांगे म्हणाले.

जरांगे पाटलांचा दानवेंवर हल्लाबोल
माझ्या नादी लागू नका, मी बिघडलो तर पुरा सुफडा साफ करुन टाकेल, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुम्हाला होऊ देणार नाही असे म्हणतं मनोज जरांगे पाटील भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल केला. रावसाहेब दानवेंना मी चांगलं दादा म्हणत होतो. पण पडल्यापासून ते पिसळल्यासारखे करतायेत. मी पाडा म्हंटल असत तर लोकसभेला दानवे ३ लाख मतांनी पडले असते असेही जरांगे पाटील म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली होती. मार्चमध्ये एका कार्यक्रमाला गेलो तेव्हा केस केली होती. केस करून काय होईल. तुमचा पोरगा उभा राहील ना त्यावेळी कचका दाखवतो, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी दानवेंना इशारा दिला आहे. रावसाहेब दानवेंना मी चांगलं दादा म्हणत होतो. पण पडल्यापासून ते पिसळल्यासारखे करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. रावसाहेब दादा तुम्ही असे वागायला नाही पाहिजे. आमच्या वाट्याला जाऊ नका, तुम्हाला जेरीस अणायला वेळ लागणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. तुमच्याकडे गुंड असतील, पण आमच्या शेतकर्‍याची पोर बुक्कीत दात पाडतील असंही जरांगे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना ओरबडून नेलं, त्या तावडेंनी घोटाळा केला त्यांना दिल्लीला हुसकावून लावलं. तसेच नितीन गडकरी यांनाही हुसकावून लावल्याचे जरांगे पाटील म्हणाले. ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप वाढवली, त्यांच कुटुंब संपवलं असेही जरांगे म्हणाले. फडणवीस एकाही मंत्र्याला मोठं होऊ देत नाहीत असंही जरांगे म्हणाले. आज दीड कोटी मराठा समाज आरक्षणात गेला असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...