spot_img
अहमदनगर...म्हणुन नगरकरांनी हातात घेतली निवडणूक; आमदार जगताप नेमकं काय म्हणाले?

…म्हणुन नगरकरांनी हातात घेतली निवडणूक; आमदार जगताप नेमकं काय म्हणाले?

spot_img

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
नगर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. मागील दहा वर्षांमध्ये केलेली विकास कामे व जनतेच्या सुखदुःखात सामील होत थेट संपर्क ठेवला असल्यामुळे ऋणानुबंध निर्माण झाले असून आता माझी निवडणूक थेट जनतेनेच हाती घेतले आहे. तोफखाना बागडपट्टी सर्जेपुरा परिसरामध्ये नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो असता मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी नागरिकांच्या वतीने ठिक-ठिकाणी फुलांचा वर्षाव आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात येत होती, जनतेचे प्रेम पाहून माझा विजय निश्चित झाला आहे त्यामुळे तिसऱ्यांदा नगरकरांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे, विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून केलेली विकास कामे नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्यास यशस्वी झालो आहे. नागरिकांनी दिलेल्या मतरूपी आशीर्वादाच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार संग्राम जगताप यांनी तोफखाना, बागडपट्टी, सर्जेपुरा, मिसाळ गल्ली, सात भाई गल्ली, पावन गणपती मंदिर, ठाकूर गल्ली, परदेशी गल्ली, नवरंग गल्ली, शेरकर गल्ली, लोणार गल्ली परिसरातील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, माजी उपमहापौर दीपक सूळ, मालन ताई ढोणे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, कालिंदी केसकर, गुलाबराव पवार, सारंग पंधाडे, सुरज जाधव, पोपट पाथरे, अजय साळवे, राजेंद्र बोगा, अभिजित चिप्पा, श्वेता पंधाडे आदीसह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुप्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटीलचा कान्हूरपठारला भन्नाट डान्स, पाहण्यासाठी तोबा गर्दी

बैल पोळा उत्साहात साजरा / मानाच्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक कान्हूर पठार | नगर सह्याद्री येथे आपल्या...

सराफाला लुटणारा ड्रायव्हर जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिर्डी येथे सराफ व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी यांच्या ३.२६ कोटी रुपये...

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईला जाणार्‍या मोर्चाचे पारनेरमध्ये होणार जोरदार स्वागत

पारनेर | नगर सह्याद्री मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई...

नगरमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा धुडगूस; प्राणघातक हल्ला करत ऐवज लांबविला

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमवाघा वाघा येथे शुक्रवारी मध्यरात्री...