spot_img
ब्रेकिंग...म्हणून कामगारांचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न; उबाळे, नेमकं प्रकरण काय?

…म्हणून कामगारांचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न; उबाळे, नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
रेल्वे मालधक्क्या वरील कामगारांच्या नवीन त्रैवार्षिक करारावरून मोठे वादंग निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत. मंगळवारी सकाळी सहाय्यक कामगार आयुक्त तथा अहमदनगर माथाडी व असुरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन कवले यांच्या अध्यक्षतेखाली करारनाम्या साठी ठेकेदार संस्थांच्या मागणीवरून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला अहमदनगर माथाडी काँग्रेस विभागाच्या वतीने तीव्र आक्षेप घेण्यात आला असून पालकमंत्री, खासदार यांचा दबावातून कामगारांचा आवाज चिरडण्यात येत आहे. वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार जिल्हाध्यक्ष विलास उबाळे व शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी दिला आहे.

आंदोलक कामगारांना षडयंत्र करून बाजूला ठेवत सेटलमेंट करणार्‍यांना कामगार प्रशासनाने बैठकीला पाचरण केल्याचा आरोप करत कामगारांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची भेट घेत आपले गार्‍हाणे मांडले. माल धक्क्यावरील ठेकेदार संस्थांनी मंडळाकडे पुढील करारनाम्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्याची तात्काळ दखल घेत कवले यांनी बैठक बोलावली.

मात्र या बैठकीला त्यांनी केवळ अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, अहमदनगर रेल्वे माथाडी कामगार युनियन आणि टोळी प्रमुखांना पाचारण केले आहे. यावर माथाडी काँग्रेस विभागाने तीव्र आक्षेप घेतला आहे. सहायक कामगार आयुक्त मूठभर ठेकेदारांशी संगनमत करून शेकडो कामगारांची फसवणूक करत असल्याचा आरोप माथाडी काँग्रेस विभागाने केला आहे. यावेळी कामगारांनी जिल्हा कामगार प्रशासनाच्या निषेधाचा ठराव मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर केला.

किरण काळे कामगारांचे गार्‍हाणे ऐकल्यानंतर उत्तर देताना म्हणाले की, कोणत्या ही परिस्थितीत रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही. अधिकारी जरी पालकमंत्री, खासदारांच्या दबावाखाली मुठभर ठेकेदारांशी संगनमत करत वागणार असतील तर त्यांना लोकशाही मार्गाने वठणीवर आणण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या हितासाठी काँग्रेसची सर्व ताकद ही कामगारांच्या पाठीशी उभी केली जाईल असे काळे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...