spot_img
ब्रेकिंगतर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

spot_img

नागपूर / नगर सह्याद्री –
खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारासाठी ही बातमी महत्वाची आहे. परिश्रम, सखोल अभ्यास, नियोजन, कुशाग्र या चारसूत्रीच्या पाठबळावर ही परीक्षा पास करणाऱ्या भावी गुरुजींना पात्रता प्रमाणपत्राची मागील तब्बल सहा महिन्यापासून आतुरतेने प्रतीक्षा होती. परीक्षेचा ऑनलाईन निकाल सहा महिन्यापूर्वी जाहिर होऊनही हाती प्रमाणपत्र मिळाले नाही. एक दोन महिने नव्हे तब्बल सहा महिन्यापासून उमेदवारांची प्रतीक्षा कायम होती. त्यांचे जीव टांगणीला लागले होते. त्यानंतर टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता शिक्षक सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केलेला आहे. काय आहे ते बघूया.

सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. ही परीक्षा देणे बंधनकारक आहे का असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र, तामिळनाडूसह काही राज्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर हा निकाल देण्यात आला. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) २०१० मध्ये इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक अर्हता ठरवली होती. त्यानंतर एनसीटीईने टीईटी परीक्षा सुरू केली.

न्यायालयाचा निर्णय काय?
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपांकर दत्ता, न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षे शिल्लक आहेत तेच फक्त परीक्षा न देता आपल्या सेवेचा कालावधी पूर्ण करू शकतील.

पण ज्यांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे, त्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊन सक्तीची निवृत्ती स्वीकारावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

अल्पसंख्याक समुदायाच्या शिक्षण संस्थांतील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का, त्यामुळे या शिक्षण संस्थांच्या हक्कांवर काही परिणाम होणार आहे का याची तपासणी करण्यासाठी हा मुद्दा विस्तारित खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...

मुंबई हायअलर्टवर! गणपती विसर्जनाआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी ; ३४ मानवी बॉम्ब अन आरडीएक्स…

मुंबई / नगर सह्याद्री - मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात...