spot_img
ब्रेकिंगकुस्ती विजेत्यांवर होणार पारितोषिकांची बरसात; थार, बोलेरो, बुलेट, स्प्लेंडरसह 'इतक्या' सोनाच्या अंगठ्या

कुस्ती विजेत्यांवर होणार पारितोषिकांची बरसात; थार, बोलेरो, बुलेट, स्प्लेंडरसह ‘इतक्या’ सोनाच्या अंगठ्या

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर मध्ये होत असलेल्या महाराष्ट्र केअरी कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांवर प्रथमच बक्षिसांची बरसात होणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यास मानाची चांदीच्या गदे बरोबरच माझ्या वतीने थार ही अलिशान चारचाकी गाडीही देण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्या कुस्तीगीरास बोलीरो चारचाकी गाडी देण्यात येणार आहे. कुस्तीगीरांना अधिक प्रेरणा मिळावी, कुस्ती क्षेत्राला चालना मिळावी, नवी पिढी या क्षेत्राला जोडली जावी हा या मागचा उद्दें आहे, अशी माहिती जिल्हा कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष व स्पर्धेचे आयोजक आ. संग्राम जगताप यांनी दिली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लांना देण्यात येणाऱ्या बक्षीसांबद्दल माहिती देताना स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप म्हणाले, महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या पहिलवानाला नेहमीप्रमाणे मानाची चांदीची गदा देण्यात येईलच शिवाय त्याचा विशेष सन्मान म्हणून माझ्या वतीने धथार ही चारचाकी गाडीही बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्या पैलवानालाही बोलेरो ही चार चाकी गाडी देण्यात येणारे आहे. आत्तापर्यंत झालेल्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये केवळ पहिल्या दोन स्पर्धकांनाच बक्षीसे दिली जात होती.

पण यावष अहिल्यानगर मध्ये होणारी वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती या स्पर्धेत तृतीय क्रमांकावर असलेल्या स्पर्धकालाही खास बक्षीस दिले जाणार आहे माती विभागात नऊ आणि गादी विभागात नऊ अशा 18 वजनी गटांमध्ये ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे या सर्व गटांमधील प्रत्येक विजेताला एक बुलेट मोटरसायकल, उपविजेत्याला स्प्लेंडर मोटरसायकल आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या पैलवानाला अर्धा तोळा सोन्याची अंगठी अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

या बक्षिसांसाठी थार मोटार, बोलेरो कार तसेच 18 बुलेट, 20 स्प्लेंडर आणि 30 सोन्याच्या अंगठ्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेनेही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी 25 लाखाचा निधी दिला आहे. या निधीतून गादी विभागाचे दोन आणि माती विभागाचे दोन आखाडे, तसेच मैदानात 25 हजार प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली असून राज्यतून आलेल्या 860 मल्लांची राहण्याची व खुराकाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...