विश्वनाथ कोरडे । देवीभोयरे व पानोलीत २ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या विकाच कामाचे भूमिपूजन
पारनेर। नगर सहयाद्री
काम मागण्यासाठी आलेल्या माणसांना झुलवत ठेवण मला जमत नाही आणि आजवर कधीही जमलं नाही. पुढाऱ्यांच्या दारात जनतेने काम मागण्यासाठी चकरा मारल्याच पाहिजेत असं कुठल्या लोकशाहीत लिहून ठेवलंय? स्वातंत्र्यापासून रुळलेल्या या आडवाटांच्या पाऊलखुणा पुसण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो, जनतेचे अधिकार जनतेला मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असल्यानेच मी पारनेरच्या राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या नजरेत खटकत असल्याचे मत भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी देवीभोयरे व पानोली येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, तालुकाअध्यक्ष राहुल पाटील शिंदे, सचिन पाटील वराळ, सरपंच लहू भालेकर, सरचिटणीस सागर मैड, महिला मोर्चा तालुकाअध्यक्ष सोनाली सालके, नवनाथ सालके, आप्पाभाऊ गोपाळे, माजी सरपंच नानुबाई मुळे, सत्यवान बेलोटे, सुजाता गाजरे, माजी उपसरपंच विकास सावंत, दत्तात्रय बेलोटे, श्रीराम संस्थेचे व्हा.चेअरमन गोपीचंद बेलोटे, वि.का.सोसायटी संचालिका वंदना बेलोटे, अक्षय बेलोटे, अशोक बेलोटे, कमलाकर बेलोटे, वसंत गायकवाड, अक्षय गायकवाड, सुरेश गायकवाड, अजिंक्य बेलोटे, अमित मुळे, शरद बोरुडे तर पानोली येथे उद्योजक सुरेश पठारे, माजी सरपंच लाभेश औटी, दादाभाऊ वारे, शब्बीर इनामदार, आप्पाभाऊ गोपाळे, दीपक इंगळे, सरपंच संदीप गाडेकर, उपसरपंच बाईसा काळोखे, इंद्रभान गाडेकर, गोरख भगत, राजू गायकवाड, रामदास शिंदे, स्वप्निल गायकवाड, प्रकाश खामकर, संजय काळोखे, अरूण काळोखे यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना कोरडे म्हणाले की, तालुक्यातील सध्याच्या राजकारणात जास्त खर बोलणारी, खर वागणारी माणसं टिकत नाहीत अथवा जाणीवपूर्वक ती टिकवून दिली जात नाहीत. मुळात राजकारण हा माझा पिंड नाही, मला कुठलाही राजकीय वारसा नाही.
आजवर जे समाजकारण करता आलं त्या समाजकारणावरच माझ्या आजच्या राजकारणाचा पाया रचला गेलाय. त्यामुळे इतिहासातल्या या तालुक्यातील राजकारणाच्या पाऊलखुणा पुसण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि आज स्थानिक नागरिकांच्या अल्प प्रमाणात मागण्या असतानाही त्या मागण्यांच्या दहापटीहुन अधिक निधी देत या कामांचा होत असलेला शुभारंभ हा त्याचाच एक भाग आहे.
देवीभोयरे येथे १ कोटी ८३ लक्ष १३ हजार रुपये तर पानोली येथे १ कोटी १० लक्ष २८ हजार रुपये असा एकुण २ कोटी ९३ लक्ष ४१ हजार रुपयांचा निधी देऊन स्वातंत्र्योत्तर काळात ज्या रस्त्यांकडे कुणीही आणि कधीही लक्ष दिले नव्हते अशी कामे करत इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याच भाग्य मला मिळाले असल्याचे ते यावेळी म्हणाले.
प्रत्येक घरात विकासाची गंगा
तालुक्यातील प्रत्येक गावात आणि गावातल्या प्रत्येक घरात विकासाची गंगा पोहचविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व कोरडे दादांचा कार्यकर्ता असल्याचा मला कायम अभिमान राहिला असून दादांनी शुभारंभ केलेल्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या या कामातुन विकासाच्या गप्पा मारणाऱ्या तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील नेतृत्वानी धडा घ्यायला हवा.
– कमलाकर बेलोटे मेजर (देवीभोयरे)
फार दिवसापूर्वीच काम मार्गी
आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील लहान मुलांना शाळेत जाताना पावसाळ्याचे चार ते पाच महिने चिखलातूनच जाव लागायचं… त्यांचे पाय चिखलाने भरायचे, आमच्या लोकांची फार दिवसापासुनची मागणी होती, आज ते काम तुमच्या हाताने मार्गी लागलं तुम्हाला आमचेच नाही तर आमच्या लेकरांचेही आशीर्वाद मिळतील.
– बायसा संजय काळोखे (उपसरपंच पानोली)